Friday, 1 March 2019

धनगर समाजाच्या मागण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन; आंदोलकावरील गुन्हेही मागे घेणार- चंद्रकांत पाटील

SHARE
धनगर समाजाच्या मागण्यांसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती गठित
पसमितीची पहिली बैठक शनिवारी
By Sanjay Patil--
मुंबई : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (TISS) यांनी सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने धनगर समाजाच्या विविध मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ उपसमिती गठित केली. उपसमितीची पहिली बैठक उद्या शनिवार दि. २ मार्च रोजी होणार आहे.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील या उपसमितीमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील, सुभाष देसाई, प्रा. राम शिंदे, महादेव जानकर, पंकजा मुंडे, विष्णू सवरा, एकनाथ शिंदे, राजकुमार बडोले आणि संभाजी पाटील-निलंगेकर या सदस्यांचा समावेश आहे.






मुंबई : धनगर समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली असून या समितीची पहिली बैठक शनिवारी होणार आहे. त्याचबरोबर धनगर समाजाच्या आंदोलनात सहभागींवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

धनगर समाजाच्या मागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून त्याबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येणार असल्याचे श्री. पाटील यांनी गुरूवारी आंदोलकांना भेटून सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर आज समिती स्थापन झाली असल्याचे त्यांनी सांगितले. या समितीमध्ये विविध विभागाचे मंत्री, सचिव यांचा सहभाग आहे. धनगर समाजाला विविध सुविधा देण्यासंदर्भात या उपसमितीमध्ये निर्णय होणार आहेत.

सोलापूर विद्यापीठास राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची प्रक्रिया पूर्णत्वास

सोलापूर विद्यापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर नाव देण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत आली असून येत्या मंत्रीमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब होऊन निर्णय होणार आहे. त्यानंतर लवकरच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज व राज्यातील मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे हे सोलापूर येथे जाऊन विद्यापाठीचे नामकरण करणार असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.
SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

0 comments: