Friday 15 March 2019

मनुवादाचे पुरस्कर्ते कधीही तुमचे भले होऊ देणार नाहीत: भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद

SHARE


संजय पाटिल द्वारा - नागपुर
नवी दिल्लीः भारताचे संविधान ज्या दिवशी धोक्यात येईल, त्या दिवशी कोरेगाव-भीमाची पुनरावृत्ती करू, अशा इशारा भीम आर्मी  प्रमुख चंद्रशेखर आज़ाद यांनी दिला आहे. दिल्लीतील जंतर-मंतर मैदानात बहुजन हुंकार रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते. या विधानानंतर नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मतदान करण्यापूर्वी रोहित वेमुलाच्या हौतात्म्याची आठवण ठेवा. ऊना हिंसाचार, २ एप्रिल या घटना विसरता कामा नयेत. आपल्या लोकांवर कोणी गोळीबार केला, त्याला बगल देत मतदान करणार का, अशी विचारणा त्यांनी यावेळी केली. अत्याचार करणारा कायम अत्याचार करत राहतो. मनुवादाचे पुरस्कर्ते कधीही तुमचे भले होऊ देणार नाहीत. गरज पडल्यास कोरेगाव-भीमाची पुनरावृत्ती केली जाईल. आत्ता त्याची आवश्यकता नाही. मात्र, ज्या दिवशी भारतीय संविधान धोक्यात आहे, असे वाटेल, त्या दिवशी कोरेगाव-भीमाची पुनरावृत्ती करण्यात येईल, असं आझाद म्हणाले. 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे आझाद यांनी यापूर्वी जाहीर केले आहे. संघटनेत याबाबत चाचपणी करणार असून, सशक्त उमेदवार न मिळाल्यास आपण स्वतः निवडणुकीला सामोरे जाऊ, असे त्यांनी सांगितले होते. 
हायलाइट्स
  • भारताचे संविधान ज्या दिवशी धोक्यात येईल, त्या दिवशी कोरेगाव-भीमाची पुनरावृत्ती करू
  • मतदान करण्यापूर्वी रोहित वेमुलाच्या हौतात्म्याची आठवण ठेवा
  • ऊना हिंसाचार, २ एप्रिल या घटना विसरता कामा नयेत
  • अत्याचार करणारा कायम अत्याचार करत राहतो
  • मनुवादाचे पुरस्कर्ते कधीही तुमचे भले होऊ देणार नाहीत: भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद
SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

1 comment:

  1. Mr Kejriwal truly said once one day came the directorship will arrived like Hitler Regime.

    ReplyDelete