Wednesday 6 March 2019

विकासाच्या माध्यमातून सामान्य माणसांच्या जीवनात परिवर्तन - देवेंद्र फडणवीस

SHARE



By Sanjay Patil -- Nagpur--
नागपुरातील गीतांजली चौक ते गांधीसागर तलावादरम्यानच्या डी.पी.रोडचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन
नागपूर : विकास योजनांची अंमलबजावणी करताना सामान्य माणसाच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. विकासाच्या माध्यमातून सामान्य माणसांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यामागची शासनाची भूमिका असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

गीतांजली चौक ते गांधीसागर तलावादरम्यानच्या डी.पी.रोडचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
रजवाडा पॅलेस येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेमहापौर नंदा जिचकारआमदार डॉ. मिलिंद मानेआमदार विकास कुंभारेनगरसेवक दयाशंकर तिवारीमहानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांची उपस्थिती  होती.
नागपूर हे 21 व्या शतकातील बदलते शहर म्हणून उदयास येत असून,त्यासाठी शहराच्या विविध विकासकामांसाठी राज्य शासन आवश्यक ती मदत करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देशभरासह राज्यात विविध क्षेत्रांमध्ये विकासकामे सुरु आहेत. या सर्व क्षेत्रांमधील विकासकामांमुळे बदलत्या भारताचे चित्र स्पष्ट होत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी समाजातील शेवटच्या घटकातील माणसाला लाभ मिळावाअसे शासनाचे प्रयत्न आहेत. त्यामुळेविकासाचा फायदा देशातल्या समाजातल्या सर्व घटकांना मिळत आहे. गरीबांना मालकी  हक्क पट्टे वाटपही हाच दृष्टिकोन समोर ठेवून केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे राज्यात विविध रस्ते तसेच उड्डाणपूलाचे काम मोठ्या वेगाने होत आहे. आज डी.पी. रोडच्या कामाचेही भूमिपूजन करण्यात आले असून गांधीसागर तलावाच्या पुनर्विकासाच्या कामाला आवश्यक निधी राज्य शासनाकडून दिला जाईल. तसेच ई लायब्ररीलाही मान्यता देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देताना ई-लायब्ररीचा प्रस्ताव शासनाकडे तात्काळ पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी नागपूर महानगरपालिकेला केल्या.
गांधीसागर तलाव हा नागपूरचे वैभव असूनगांधीसागरच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आणि गांधीसागरचे पाणी शुद्धीकरण करण्यासाठी आवश्यक तो निधी राज्य शासन देईल. सोबतच महानगरपालिकेच्या शाळेची जागा अटलई-लायब्ररी करण्यासाठी मान्यता देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
मेयो हॉस्पिटल ते भंडारा रोड रस्त्यासह आणखी एका रस्त्याचे भूसंपादनाचे काम मंजूर झाले आहे. रस्त्याच्या विकासकामात नागरिकांचे घर जात असेल त्यांना बाजारभावाने मोबदला मिळेल.तसेच एम्प्रेस मिलच्या बाजूच्या जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेडिमेड गारमेंट झोन तयार करण्यात येणार आहे. या रेडिमेड गारमेंट झोनच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळणार असूनत्याबाबत ही रि-टेंडर करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.
शुक्रवारी तलावाचे पाणी स्वच्छ करणे कठीण काम असले तरी पाणी शुद्ध करण्याचे काम करण्यात येईल. त्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक तो निधी नक्कीच मिळेलअसा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. तसेच एम्प्रेस मिलची जागा रेडिमेड गारमेंट झोनसाठी राखीव होती. त्याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेडिमेड गारमेंट झोन उभारण्यात येईल. त्यामुळे स्थानिक महिलांना रोजगार मिळणार आहे. त्या रोजगारांच्या माध्यमातून महिला स्वावलंबी होतीलअसा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
यावेळी अब्दुल रज्जाकशेख लालनूर खानमदार खानव जोहराबी नूर मदार खानबल्लु शेख शेख सुभानसय्यद खुर्शीद अलीरहमत अलीनजमा शेख रहीम,शेल लतिफशेख बाबु शेख इब्राहीमशेख बाबूअहमद खानअब्दुल रहमान शेख रमजानबेबी तब्बसुममोहमद उसुफमोहमद रमजान आणि मदन सालिकराम वर्मा यांना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूखंड मालकी हक्क पट्टे वाटप करण्यात आले.
SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

0 comments: