Thursday 28 March 2019

सागर देशमुख साकारणार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर "बाबासाहेब"

SHARE

संजय पाटील द्वारा : नागपुर--‘भाई’ चित्रपटात महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे यांची भूमिका साकारणारा अभिनेता सागर देशमुख आता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारित ही मालिका असून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ असं तिचं नाव आहे. लवकरच सुरू होणाऱ्या या मालिकेतून बाबासाहेबांच्या आयुष्यातील सोनेरी पानं प्रेक्षकांसमोर उलगडली 
या मालिकेमुळे आणखी एक चरित्र मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. सध्या छोट्या पडद्यावर 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं', 'स्वराज्यरक्षक संभाजी' यासारख्या मालिका सुरू आहेतच. तसंच जिजाऊंवर आधारित एक मालिकाही लवकरच येतेय. त्यामुळे येत्या काळात टीव्हीवर चरित्रमालिकांची चलती असेल. देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार आणि लोकशाहीचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवनचरित्र हे प्रत्येकासाठी स्फूर्तीदायी आहे. महामानव अशी ओळख असलेल्या या महान व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारण्याचा मान सागरला मिळाला आहे. ‘भाई’मधल्या त्याच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा या महत्त्वपूर्ण भूमिकेत तो दिसणार आहे. 

सागर स्वत: वकीलसुद्धा आहे. सहा वर्ष त्यानं मुंबई-पुण्यामध्ये वकिली केली होती. त्यामुळे प्रख्यात कायदेतज्ज्ञ असणाऱ्या बाबासाहेबांची भूमिका साकारताना, सागरचं स्वत: वकील असणं त्याच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. मालिकेचं दिग्दर्शन अजय मयेकर करणार आहेत. दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेसाठी सागरची निवड केली असून, विशाल पाठारे यांनी मेकअप डिझाईन केलं आहे. 

वकिलीचा अभ्यास मी केला असल्यामुळे डॉ. आंबेडकरांशी तसा यापूर्वीच संबंध आला होता. भारतीय राज्यघटना आणि बाबासाहेब, त्यांचे विचार, त्यांचं काम माझ्या वाचनाचा महत्त्वाचा भाग होता. आता डॉ. आंबेडकरांची भूमिका साकारताना त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा नव्यानं अभ्यास करतोय. त्यांची भूमिका समजून घेण्यासाठी मला माझा होमवर्क करावा लागतोय. वाचनाबरोबरच प्राध्यापक सुखदेव थोरात यांची बाबासाहेबांवरील व्याख्यानं ऐकतोय. आंबेडकरांच्या चित्रफिती पाहून त्यांचे हावभाव, बोलणं-चालणं टिपण्याचा माझा प्रयत्न आहे. 
SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

0 comments: