Thursday 14 March 2019

pressure by BJP uses on Congress---- Prakash Ambedkar

SHARE




संजय पाटिल द्वारा - नागपुर: अकोला - ‘देशाच्या राजकारणात सध्या दबाबतंत्राचा नवीन फंडा सुरू झाला आहे. देशभर काँग्रेसशी कोणत्याही पक्षाची युती होऊ नये म्हणून दबावतंत्राचा वापर होत आहे. भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे सूतोवाच त्या उद्देशानेच आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी अकोला येथे केला.
समझोत्याचे राजकारण केले तर तुरुंगाची हवा नक्की, असे घृणास्पद राजकारण सध्या देशात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ‘‘१९९० च्या लोकसभेमध्ये मी गेलो तेव्हा असेच आरोप बेछूटपणे केले जात होते. त्यात अनेक मंत्री, नेते संपले. आतासुद्धा ‘ब्लॅकमेलिंग’चेच राजकारण सुरू आहे. त्यात काही बळी पडले तर काही खंबीरपणे उभे आहेत. दबावतंत्राचा वापर माझ्यावरही झाला होता. शरद पवार यांनी उमेदवारी मागे घेणे, विखे पाटील यांचा मुलगा भाजपमध्ये जाणे, रणजितसिंह मोहिते पाटील यांचा मुलगा मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असणे, हे सर्व दबावाचे बळी आहेत,’’ असा आरोपही आंबेडकर यांनी केला.
‘भारिप-बमसं’चे लवकरच विलीनीकरण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या रिपब्लिकन चळवळीचे पुनरुज्जीवन करून भारिप-बहुजन महासंघाची स्थापना चार दशकांपूर्वी करण्यात आली होती. भारिप म्हणून राजकारणात पक्ष विस्ताराला येणाऱ्या मर्यादा लक्षात घेता भारिप-बमसंच लोकसभेनंतर वंचित बहुजन आघाडीत विलीन करण्यात येणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी या वेळी दिली.
आंबेडकर म्हणाले...
    जमीन गैरव्यवहार रॉबर्ट वद्रा यांच्यासह संपूर्ण कुटुंब सहभागी असल्याचे पुरावे होते, ते आधी का दिले नाहीत
    नाना पटोले हे काँग्रेसचे डमी उमेदवार आहेत. संघाच्या दबावतंत्राचा तो एक भाग आहे.
    वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी शुक्रवारी (ता. १५) जाहीर करणार
SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

0 comments: