Collector orders urgent action
By Sanjay Patil : Chandrapur - Despite frequent instructions on the urgent completion of the works on the main road, these works are being delayed by the concerned contractor. Due to this, the accident has happened once again yesterday and the state Assistance and Rehabilitation Minister and Guardian Minister of Chandrapur district, Vijay Wadettiwar, have been directed to file a complaint on the contractor who caused the accident.
Collector Dr. While directing Kunal Khemnar today, he said that many people have to face accident due to neglect of this road. It is a very windy road and was expected to be completed in time. But I noticed that they were ignoring it. The Guardian Minister Vadettiwar has also made it clear that this is not right.
A two-wheeler was injured in a truck and two-wheeler collision yesterday at Netaji Subhash Chandra Bose Chowk in the Bengali camp area here around noon. Children were traveling from Ballarpur on a truck and two-wheeler. Two young men were seriously injured in a two-wheeler collision when a truck collided with a truck while it was shifting towards the child. These youths suffered permanent disability in these accidents. The matter is very serious and it is only because of the pending road work that such incidents should not take place, he added. The Guardian Minister expressed his condolences to the young man who was injured in the incident and said that he was reviewing all the pending work in the district soon.
.
जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश
द्वारा संजय पाटील : चंद्रपूर - मुल मार्गावरील कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत वारंवार सूचना केल्यानंतर देखील संबंधित कंत्राटदाराकडून या कामांमध्ये अतिशय वेळ होत आहे. त्यामुळे काल पुन्हा एकदा अपघात झाला असून ह्या अपघाताला कारणीभूत असलेल्या कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना यासंदर्भात आज निर्देश देताना त्यांनी या रस्त्याच्या या कामकाजाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत असल्याचे स्पष्ट केले. हा अत्यंत वर्दळीचा रस्ता असून वेळेत हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात आले. असून हे योग्य नाही, असे देखील पालकमंत्री वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.
काल ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी झाल्याची घटना येथील बंगाली कॅम्प परिसरात नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. ट्रक आणि दुचाकी स्वार बल्लारपूर वरून मुल जात होते. चौकात मुलच्या दिशेने वळण घेताना ट्रकचा धक्का लागल्यामुळे दुचाकी अनियंत्रित होऊन दोन तरुणांना गंभीर अपघात झाला. या अपघातांमध्ये या तरुणांना कायमचे अपंगत्व आले. ही बाब अतिशय गंभीर असून केवळ प्रलंबित रस्त्यांच्या कामामुळे अशा घटना घडता कामा नये, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. या घटनेत अपघात ग्रस्त झालेल्या या तरुणाप्रती पालकमंत्र्यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या असून जिल्ह्यात सुरू असणाऱ्या सर्व प्रलंबित कामाचा लवकरच आपण आढावा घेत असल्याचे म्हटले आहे.
0 comments: