Monday, 24 February 2020

इंदू मिलमधील डॉ. आंबेडकर स्मारकाचे काम युद्धपातळीवर करण्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश : संजय पाटील

SHARE


संजय पाटील : मुंबई : इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम युद्धपातळीवर करण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी दिल्या. कामाची प्रगती पाहण्यासाठी मंगळवारी स्वतः सर्व संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांसह स्मारकाच्या जागेस भेट देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासंदर्भात विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक झाली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडेखासदार राहुल शेवाळे उपस्थित होते.श्री. पटोले म्हणालेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हे जागतिक दर्जाचे व्हावे. लवकरात लवकर हे स्मारक पूर्ण व्हावेअशी अनुयायांची भावना आहे. त्यामुळे ‘एमएमआरडीए’ने स्मारकाचे काम युद्धपातळीवर करावे. स्मारकाच्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय विद्यापीठ व्हावेअशी मागणी आहे. याबाबतची शक्यता पडताळून पहावी.

श्री. बनसोडे यांनीही स्मारकाचे काम लवकरात लवकर व्हावेअशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच श्री. शेवाळे यांनी स्मारक व चैत्यभूमी यांना जोडणारा रस्ताही करण्यात यावाअशी सूचना करून चैत्यभूमीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या वतीने सरचिटणीस श्री. नागसेन कांबळे व अध्यक्ष श्री. महेंद्र कांबळे यांनी स्मारकासंबंधीच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. स्मारकाच्या कामाचा वेग वाढवावास्मारकाचे मुख्य प्रवेशद्वार हे सांची स्तुपाच्या रुपात असावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर स्टॅच्यू ऑफ इक्विटी असे लिहावे. सुसज्ज ग्रंथालय असावेस्मारकाच्या ठिकाणी सामाजिक न्याय विद्यापीठ स्थापन करावेडॉ. आंबेडकर यांचे संघर्ष दाखविणारे चित्रणविविध आंदोलनाचे चित्रण तसेच त्यांचे आई-वडीलपत्नीचे शिल्प रेखाटावेडॉ. आंबेडकरांच्या भाषणाचे प्रदर्शन दालन उभारावे आदी मागण्या यामध्ये मांडण्यात आल्या. यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती सोनिया सेठीवास्तुरचनाकार शशी प्रभू आदी यावेळी उपस्थित होते.

SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

0 comments: