Friday, 13 March 2020

सीएएद्वारे हिंदूंनाच ब्राह्मणी व्यवस्थेचे गुलाम बनविण्याचे षडयंत्र:पालकमंत्री नितीन राऊत: संजय पाटील

SHARE
Image result for nitin rout

संजय पाटील : नागपूर: हिंदुत्ववादाच्या नावाखाली देशात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाने या देशातील हिंदूंनाच परदेशी ठरवून त्यांना लाखोंच्या संख्येत आसाममध्ये निर्वासितांच्या छावणीत राहण्याची वेळ आणली आहे. त्यांच्या मदतीसाठी स्वतःला हिंदूंचे रक्षक म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल अथवा विश्व हिंदू परिषद यापैकी कोणीच पुढे आलेले नाहीत. जातीय भांडण लावून पुन्हा या देशात वर्णव्यवस्था निर्माण करून बहुसंख्य हिंदूंना ब्राह्मणीव्यवस्थेचे गुलाम बनविण्याचे षडयंत्र सीएएच्या व एनआरसीच्या माध्यमातून रचले जात आहे, असा आरोप राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केला.


भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून या देशात सामाजिक समता निर्माण करण्याचा प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला आहे. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपला घटनाच मान्य नाही. कारण त्यांना या देशात वर्णव्यवस्था निर्माण करायची आहे. वेळोवेळी राज्यघटना बदलण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत. त्यांच्या घटना बदलण्याच्या कृतीला या देशातील जनतेने विरोध केल्याने सीएएच्याद्वारे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी संसदेत कायदा पास करून देशातली नागरिकांनाच आता ते या देशाचे नागरिक आहेत हे सिद्ध करावे लागणार आहे. जे हिंदू, आदिवासी, दलित, भटके विमुक्त व इतर आपले नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी दस्तावेज व पुरावे देऊ शकणार नाही त्यांना आपली मालमत्ता व रोजगाराला मुकावे लागून निर्वासितांच्या छावणीत जीवन जगावे लागणार आहे, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

Nagpur: The Bharatiya Janata Party, which came to power in the country under the name of pro-Hinduism, has made Hindus of this country a foreigner and has brought them millions to live in refugee camps in Assam. None of the Rashtriya Swayamsevak Sangh, Bajrang Dal or Vishwa Hindu Parishad, calling themselves Hindus' protectors, have come forward to help them. CAA and NRC have alleged that conspiracies are being hatched by the CAA and the NRC to create a caste system in this country and again enslave the majority of Hindus

The Indian Constitution seeks to create social equality in this country. Powered by Blogger. But the RSS and the BJP do not agree. Because they want to create a system in this country. He has tried to change the constitution from time to time. As the people of this country opposed the change of their affairs, the CAA has to pass a law in Parliament to prove citizenship and prove that the citizens of the country are now citizens of this country. Raut has warned that those who cannot provide documents and evidence to prove their citizenship, Hindus, tribals, Dalits, wanderers and others, will have to leave their property and employment and live in the camps of refugees.
SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

3 comments:

  1. ब्राह्मणवादी भूमिकेवर टीका करण्याचा अधिकार सर्वाना आहे. पण, जातीयवादी वक्तव्य करू नये. ब्राह्मण समाजाविषयीचे डॉ. नितीन राऊत यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे, असे स्पष्ट मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्या अंत्यसंस्कारासाठी ते नागपुरात आले होते. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नितीन राऊत हे मंत्री असल्याने त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती अशी खंत व्यक्त केली. राऊत यांचा रोष बहुतेक भाजपवर असावा. पण भाजपमध्ये सर्वच जातीधर्माचे लोक असून तिथे जातीभेदाला थारा नाही, असेही आठवले म्हणाले. बाबासाहेब ब्राह्मणांचे विरोधक नव्हते. त्यांनी स्वत: ब्राह्मण महिलेशी लग्न केले होते. माझी पत्नीही ब्राह्मण आहे. अशा विरोधामुळे ब्राह्मण आणि दलित समाजात दुरावा वाढतो. त्यामुळे जातिवाचक बोलणे चुकीचे आहे. ब्राह्मण समाजातील अनेकांनी दलित चळवळीला सहकार्य केले असे स्वत: बाबासाहेब म्हणायचे. अनेक ब्राह्मण लोक बाबासाहेबांसोबत होते. ब्राह्मण लोकांनी बाबासाहेबांची भूमिका मांडली आहे. त्यामुळे ब्राह्मणवादी भूमिकेला विरोध असावा पण असे जातीयवादी वक्तव्य करू नये. व्यक्तिगत जातीय टीका टाळावी असेही आठवले म्हणाले.



    सरकार नक्कीच पडणार

    महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर न्यायालयाने चोवीस तासात त्यांना बहुमत सिद्ध करायला लावले होते. मात्र, मध्यप्रदेश विधानसभेचे अध्यक्ष हे काँग्रेसचे असल्यामुळे त्यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी काँग्रेसला अधिकचा वेळ दिल्याचा आरोप आठवले यांनी केला. आमच्यासोबत काँग्रेसचे २२ आमदार असून कमलनाथ सरकार नक्कीच पडणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर अन्याय झाला असल्याने त्यांनी बंड केले. राहुल आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास नसल्यामुळे ते भाजपात आल्याचेही आठवले म्हणाले.

    महाराष्ट्रातही राजकीय भूकंप होणार

    मध्यप्रदेशप्रमाणे छत्तीसगड, राजस्थान आणि झारखंड तसेच महाराष्ट्रातही राजकीय उलाथापालथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबत येऊन नव्याने सरकार बनवावे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या तालमीत घडले आहेत. मात्र, आज त्यांच्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावात काम करण्याची नामुष्की ओढवली अशी टीका आठवले यांनी केली. यावेळी त्यांनी करोना संदर्भात अफवांवर विश्वास न ठेवता सामूहिक लढा द्यावा असे आवाहन केले. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे. तो भारताच्या ताब्यात आल्यास दहशतवाद पूर्णपणे कमी होईल. लवकरच काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जाईल, असेही ते म्हणाले.

    ReplyDelete
  2. 'सीएए व एनआरसीबद्दल बोलताना मी केलेले वक्तव्य मनुवाद व चातुर्वर्ण्याच्या विरोधात होते. माझा रोख मनुवाद पाळणाऱ्या संघाकडे होता. ब्राह्मण समाजाला दुखावण्याचा माझा अजिबात उद्देश नव्हता,' असं स्पष्टीकरण राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिलं आहे.

    महिला दिनाचे औचित्य साधून फुले, शाहू, आंबेडकर विचारसंवर्धन समितीनं राऊत यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी सीएए, एनआरसी व एनपीआरला विरोध दर्शवताना राऊत यांनी ब्राह्मणांवर कडवट शब्दांत टीका केली होती. बामन स्वत: परदेशातून आले आहेत आणि आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत. आमच्याकडं प्रमाणपत्र मागताहेत. हे कदापि खपवून घेणार नाही, असं राऊत म्हणाले होते. राऊत यांच्या या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ माजला. भाजप नेत्यांनी राऊत यांच्यावर चौफेर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसंच, त्यांच्याविरोधात नागपूरमधील जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रारही करण्यात आली. राऊत यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी ब्राह्मण सेनेनं केली होती.

    या पार्श्वभूमीवर राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या वक्तव्याचा खुलासा केला आहे. 'काँग्रेस पक्ष ब्राह्मण नव्हे तर चातुर्वर्ण्य आणि मनुवाद मानणाऱ्या ब्राह्मण्यवादी विचारांचा विरोध करतो. काँग्रेस पक्षातर्फे अनेक नेत्यांनी देशाचे नेतृत्व केले. त्यात अनेक ब्राह्मण होते आणि आहेत. पुरोगामी विचारधारा रुजविण्यासाठी अनेक ब्राह्मण नेते अग्रेसर होते आणि आहेत. त्यांचा आम्हाला अभिमान आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

    ReplyDelete
  3. 'माझ्या वक्तव्याचा रोख मनुवाद पाळणाऱ्या संघाकडे होता. त्याच उद्देशानं मी वक्तव्य केलं होतं. ब्राह्मणांना दुखावण्याचा माझा किंचितही उद्देश नव्हता. कुणी गैरसमज करून घेऊ नये,' अशी विनंतीही राऊत यांनी केली आहे.

    ReplyDelete