Tuesday, 21 April 2020

टाळेबंदीतील मदत वाटपातही पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची ‘चमकोगिरी’! संजय पाटील

SHARE

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे छायाचित्र असलेल्या पाकिटात खाद्यपदार्थ वितरित केले जात आहेत.

संजय पाटील : नागपूर : करोनामुळे लागू टाळेबंदीने रोजमजुरी करणाऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे विविध संस्था, संघटना त्यांची मदत करीत आहे. परंतु मदत करण्यातही राजकारण शिरल्याचे दिसून येते. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे छायाचित्र असलेल्या पाकिटात खाद्यपदार्थ वितरित केले जात आहेत. मदतवाटपातही चमकोगिरी करण्याचा पालकमंत्र्यांचा हा प्रकार मंगळवारी उजेडात आला.
सामाजिक, स्वयंसेवी संस्था गरजवंतांच्या मदतीसाठी धावून जात असल्याचे चित्र आहे. पण काही संस्था मदत करतानाचे छायाचित्र काढून प्रसिद्धी माध्यमांना पाठवत आहेत. राजकीय पक्ष आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेला फलक लावत आहेत. परंतु सर्वाधिक चर्चा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अन्नदानाची रंगली आहे. त्यांनी वाटलेल्या खाद्यपदार्थाच्या पाकिटांवर चक्क स्वत:चे व पक्षाचे छायाचित्र लावण्यात आले आहे.
पाालकमंत्री डॉ. राऊत यांच्या मार्गदर्शनात काम करीत असलेल्या संकल्प सामाजिक संघटनेच्या माध्यमातून दररोज दहा हजार जेवणाची पाकिटे वितरित केली जात आहेत. ते तयार करण्यासाठी ठवरे कॉलनीतील एका भवनात व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी युवक काँग्रेस तसेच इतर कार्यकर्त्यांची फौज काम करीत आहेत.
जेवणाच्या पाकिटांवर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे छायाचित्र चिकटवण्यात येत आहे. तसेच संबंधित ठिकाणी त्यांचे फलकही लावण्यात आले आहेत. पाकिटांवर काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाच्या खाली ‘मदतीचा हात’ असे लिहिले आहे.
या संस्थेतर्फे दररोज सकाळ, सायंकाळ १० ते १२ वस्त्यांमध्ये पालकमंत्री यांचे छायाचित्र असलेल्या पाकिटातून जेवण वितरित केले जात आहे.
SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

0 comments: