संजय पाटील : नागपूर : करोनाची रुग्णसंख्या दिवसागणिक वाढू लागल्याने निम्मा विदर्भ 'रेड झोन'मध्ये आला आहे. अकरापैकी नागपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला आणि बुलडाणा या पाच जिल्ह्यांमध्ये पंधराहून अधिक रुग्णसंख्या झाल्याने धोकादायक यादीत गणले गेले आहेत. वाशीम, गोंदियानंतर भंडाऱ्यातही प्रत्येकी एक करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने हे जिल्हे 'ऑरेंज झोन'मध्ये तर वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांनी 'ग्रीन झोन'मधील आपले स्थान कायम राखले आहे. जिल्ह्यात रुग्णांची नोंद होऊ नये म्हणून प्रशासन नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करीत आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आयसीएमआरने करोनाच्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने झोन निर्धारित करीत देशातील हॉटस्पॉट जाहीर केले होते. विदर्भातील नागपूर आणि बुलडाणा हे दोन जिल्हे रेड झोनमध्ये होते. नागपुरात २७ तर बुलडाण्यात केवळ १७ रुग्णांची नोंद होती. दोन्ही जिल्ह्यांमध्ये १५हून अधिक रुग्ण असल्याने त्यांचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला होता. पण, त्यानंतर तीन नवे जिल्हे रेड झोनमध्ये आले आहेत. यामध्ये यवतमाळ, अमरावती आणि अकोल्याचा समावेश आहे. या सर्व जिल्ह्यांत दिवसागणिक रुग्णसंख्या वाढू लागली आहे.
नागपुरात मंगळवारी सायंकाळपर्यंत १३३ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. बुलडाण्यात २६पैकी एकाचा एकाचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सातत्याने रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. तरीही नागपूरनंतर यवतमाळात सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यवतमाळात १३ रुग्ण सापडले असतानाच 'रेड झोन'मध्ये याची नोंद करण्यात आली होती. नागपूर आणि पुण्यात आढळलेले पण मूळचे यवतमाळकर असलेल्यांची नोंदही जिल्ह्यात करण्यात आल्याने रुग्णसंख्या १५वर पोहचली होती. नंतर माहिती विभागाने या रुग्णांची नोंद वगळत आकडेवारी जाहीर केल्याने हे रुग्ण नेमके कुठले हा वादही निर्माण झाला होता. हा वाद कायम असतानाच २५ एप्रिलला एकाच दिवशी २० पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने आकडा ४६वर पोहचला. २६ एप्रिला १६, २७ला १९ तर २८ एप्रिलला सहा नवे करोना पॉझिटिव्ह आढल्याने यवतमाळची वाटचाल शतकाकडे सुरू झाली. सध्या या जिल्ह्याची रुग्णसंख्या ८७ असून हे पवारपुरा आणि इंदिरानगर या दाट वस्तीतील असल्याने चिंता वाढली आहे.
करोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या बघता अमरावतीत परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे दिसून येत आहे. २३पैकी सात रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. ही विदर्भातील सर्वाधिक नोंद मानली जात आहे. हे सातही रुग्ण मृत्यूनंतर करण्यात आलेल्या तपासणीत पॉझिटिव्ह आढळले होते. या जिल्ह्यात २५ करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. अकोल्यात ११ एप्रिलपर्यंत केवळ १२ रुग्णांची नोंद होती. त्यामुळे हा जिल्हा ऑरेंज झोनमध्ये होता. त्यानंतर सात नव्या रुग्णांची नोंद करण्यात आल्याने पॉझिटिव्हचा आकडा १९ वर पोहचला आहे. १५ एप्रिलला एकाचा मृत्यू तर एका करोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाने आत्महत्या केली.
भंडारा 'ऑरेंज झोन'मध्ये
भंडारा जिल्हा सोमवारपर्यंत ग्रीन झोनमध्ये होता. पण, गराडा येथील एक महिला करोना पॉझिटिव्ह आढळल्याने हा जिल्हा ऑरेंज झोनमध्ये गेला आहे. आजवर निर्धास्त असलेले जिल्ह्यातील लोक हादरले आहेत. गावांच्या सीमा अधिक कडक करण्यात आल्या आहेत. गराडा परिसरातील गावे सील करण्यात आली असली तरी त्याबाहेरील गावांनीही स्वत:च्या सुरक्षेसाठी उपाय योजले आहेत. मानेगाव बाजार हे या परिसरातील मुख्य बाजारपेठेचे गाव. या गावाने गराड्यात रुग्णाची नोंद होताच गाव पंचायत बोलावून इतर गावांमध्ये जाणाऱ्या लोकांना मज्जाव केला. सोबतच सकाळी बोरगाव किंवा इतर गावांत जाणाऱ्या शेतकऱ्यांना आता गावातच दूध विक्री करण्याचे निर्देश दिले. सोशल मीडियावरही यासंबंधीचे भावनिक पोस्ट केले जात आहेत. 'शेवटी नजर लागली आमच्या जिल्ह्याला' असे स्टेट्स ठेवले जात आहेत.
ग्रीन यादीत उरले तीन जिल्हे
पूर्व विदर्भातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या चार जिल्ह्यांनी करोनाला दूर राखत ग्रीन यादीत स्थान कायम राखले होते. या जिल्ह्यांमध्ये व्यवहार सुरळीत होण्याच्या मार्गावर असतानाच भंडाऱ्यात करोना पॉझिटिव्ह आढळल्याने ग्रीन झोनमधील जिल्ह्यांत केवळ तीनच जिल्हे उरले आहेत.
Part of Bajeriya put under containment zone
Part of Bajeriya put under containment zone
Part of Bajeriya in Central Nagpur was put under containment zone by the civic authorities following emergence of one more COVID-19 positive patient on Friday. Municipal Commissioner Tukaram Mundhe issued a notification on Friday thereby putting curbs on movement of people in the area. The limits of the area is in an around Nageshwar Temple in Mahal part of Gandhibagh Zone no. 6. As per the limits to North East-upto Ganesh Temple, to North West-Nannumal building, to South West-Shitalamata Temple and to South East-Empress Mill Wall.
Civic officials put up barricades and police pickets were in place in all the four directions to strictly enforce regulated entry and exit. Only movement of essential goods and men engaged in allied activities is permitted while majority of the citizens of the area will have to stay inside the continament zone.
0 comments: