Thursday 21 May 2020

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विभागीय लेखापाल एसीबीच्या जाळ्यात : संजय पाटील

SHARE
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपूर ...
नागपूर : नागपूर प्रेस मीडिया : 21 मे 2020 :  कंत्राटदाराचे बिल मंजूर करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागणाऱ्याला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विभागीय लेखापालालाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केली. राजेश झिबलराव हाडके (वय ५४), असे अटकेतील लेखापालाचे नाव आहे.



तक्रारदार हा कंत्राटदार असून, त्याला पेरी अर्बन (जलशुद्धीकरण) पाणीपुरवठ्याचे कंत्राट मिळाले. जून महिन्यापासून या योजनेंतर्गत १० गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कंत्राटदाराने पेरी अर्बनचे व रानबोडी पाणीपुरवठ्याचे बिल मंजूर करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे अर्ज केला. बिल पास करण्यासाठी हाडके यांनी कंत्राटदाराला एक हजार रुपयांची लाच मागितली. कंत्राटदाराने एसीबीकडे तक्रार केली. अधीक्षक रश्मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भावना धुमाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचला. मात्र, हाडके यांनी लाच घेतली नाही. परंतु लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने हाडके यांच्याविरुद्ध सदर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. चौकशीनंतर एसीबीच्या पथकाने हाडके यांना अटक केली.

आयुर्वेद महाविद्यालयाचा अधिकारी लाच घेताना जेरबंद

नागपूर : 21 मे 2020:  सफाई कामगार पदावर नियुक्तीपत्र देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेणाऱ्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रंगेहात अटक केली. बंडू देसाई पवार (५५) रा. जुनी शुक्रवारी, सक्करदरा असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
बंडू पवार हे रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी असून त्यांच्याकडे सहाय्यक संचालक पदाचाही अतिरिक्त कारभार आहे. सक्करदरा भागात राहणाऱ्या तक्रारदाराचे नातेवाईक एक वर्षांपूर्वी निवृत्त झाले. त्याच्या जागी नातवाला सफाई कामगाराची नोकरी मिळावी यासाठी अर्ज करण्यात आला. अर्जदार मूळ यवतमाळ येथील रहिवासी आहे. नियुक्तीचा अधिकार सहाय्यक संचालकाकडे असल्याने तक्रारदाराने पवार यांच्याशी संपर्क साधला. पवार यांनी तक्रारदाराला दोन लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. अधीक्षक रश्मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक योगिता चाफले, संजीवनी थोरात, रेखा यादव, मंगेश कळंबे, रविकांत डहाट, अचल हरगुळे, सरोज बुधे व बन्सोड यांनी बुधवारी सक्करदरा भागात सापळा रचला. तक्रारदार पवार यांच्या घरी गेला. पवार यांनी तक्रारदाराला दोन लाख रुपये पलंगावर ठेवायला सांगितले. सायंकाळी नियुक्तपत्र देण्याचे आश्वासन दिले. याचवेळी एसीबीच्या पथकाने पवार यांना अटक केली. दोन लाख रुपये जप्त केले. पवार यांच्याविरुद्ध सक्करदरा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या जुनी शुक्रवारीतील घराची झडती घेण्यात आली.
पवार मूळ पुण्यातील रहिवासी असून, त्यांच्या पुणे येथील घराचीही एसीबीचे पथक झडती घेत आहेत.

SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

0 comments: