स'प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने लोकसभा चुनाव के लिए एक बार फिर हिंदुत्व कार्ड निकाला है : खा. असदुद्दिन ओवेसी
नागपूर-इंदोरा- 'प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने लोकसभा चुनाव के लिए एक बार फिर हिंदुत्व कार्ड निकाला है। ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (आईएमआई) के अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी ने अपने भाषण में कहा कि प्रधान मंत्री ने हिंदू-मुस्लिम भाषाओं का इस्तेमाल करना अच्छा नहीं कहा है।
बहुजन वंचित आघाडीचे नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीचे उमेदवार मनोहर डबरासे आणि किरण पाटणकर यांच्या प्रचारार्थ भारिप-बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर आणि एआयएमआयचे असदुद्दिन ओवेसी यांच्या प्रचारसभेचे आयोजन जरीपटका परिसरातील इंदोरा मैदान येथे करण्यात आले होते. यावेळी ओवेसी बोलत होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनीही भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.
पाच मिनिटेही टिकणार नाहीत मोदी!
'संविधान कमजोर करण्याचे सर्वाधिक काम हे गेल्या पाच वर्षांतच झाले आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पत्रपरिषद घेऊन देशाचे संविधान आणि लोकशाही वाचविण्याचे आवाहन करावे लागते, हे देशाचे दुर्भाग्य आहे. अशा परिस्थितीत मोदी द्वेष पसवित आहेत. मोदी दहशतवाद संपविण्याची भाषा करतात. मात्र, नथुराम गोडसे दहशतवादी होता, हे कधीच मान्य करीत नाहीत. सावरकर हेसुद्धा गांधी हत्येत सहभागी होते, असे कपूर आयोगाद्वारे नमूद करण्यात आले आहे. मात्र, याबाबत मोदी भाष्य करीत नाहीत. मोदींनी माझ्याशी चर्चा करावी, ते पाच मिनिटेसुद्धा टिकाव धरणार नाहीत.'
शरद पवार फक्त पुतण्याला वाचवू शकतात!
भाजपने तर जनतेची लूट केलीच आहे, शिवाय काँग्रेस किंवा राष्ट्रवादी जनतेचे भले करू शकत नाहीत. शरद केवळ त्यांच्या पुतण्याला वाचवू शकतात. त्यामुळे जे तुम्हाला वाचवू शकतात, अशा बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करा, असे आवाहन यावेळी ओवेसी यांनी केले.
सोनिया गांधी जावयाला वाचवेल!
'वंचित आघाडीला मतदान न करता काँग्रेसला मतदान करा, असा प्रचार जोरात सुरू आहे. मात्र, काँग्रेसला लकवा मारला आहे, हे लक्षात घ्या. मोदी हे रॉबर्ट वाड्राला गजाआड करण्यामागे लागले आहेत. त्यामुळे सोनिया गांधी यांना तिच्या जावयाची चिंता अधिक आहे. ती तुमच्या जागी आधी जावयाला वाचवेल, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कुणाला तरी जिंकवायचे आहे म्हणूनच नागपूर ज्याची जन्म किंवा कर्मभूमी नाही, असे नाना पटोलेंसारखे उमेदवार नागपुरात पाठविण्यात आले', असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.
उंदराला मारायला वाघ कशाला?
'मला अनेकांनी म्हटले की नागपुरातून तुम्हीच लढा. मात्र, उंदराला मारायाला वाघाला कशाला बोलाविता? पक्षाचा सामान्य कार्यकर्तासुद्धा हे काम करू शकतो', असा टोला आंबेडकरांनी यावेळी मारला. तसेच नागभूमीत संघाचे वर्चस्व निर्माण झाले असून, ते वर्चस्व मोडीत काढायचे आहे, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
0 comments: