Friday, 21 February 2020

टोलनाक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी लेनची संख्या वाढवा -संजय पाटील

SHARE
सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
संजय पाटील:मुंबई : मुंबई - पुणे द्रुतगती महामार्ग, ठाणे, दहीसर, ऐरोली, वाशी येथील टोलनाक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी लेन वाढवाव्यात, असे निर्देश देतानाच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ‍(‍एमएसआरडीसी)‌ राज्यातील सर्व उड्डाणपुलांचा आढावा घेऊन त्यांच्या सुशोभीकरणात एकसुत्रता असावी, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.

एमएसआरडीसीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्यावेळी मंत्री. श्री. शिंदे बोलत होते. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के आदी उपस्थित होते.

यावेळी महामंडळामार्फत विकसित करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचा आढावा मंत्री श्री. शिंदे यांनी घेतला. रस्ते, पूल, उड्डाणपुल तयार करताना त्यांच्या सौंदर्यावर अधिक भर द्यावा. रस्त्यांच्या दुभाजकांवर झाडे लावावीत, शोभीवंत कुंड्या ठेवून त्यांची निगा राखावी. राज्यभरात महामंडळाच्या माध्यमातून जे उड्डाणपूल तयार करण्यात आले आहेत त्यांचा आढावा घेण्यात यावा. या पुलांची रंगरंगोटी, सौंदर्यीकरणावर भर देताना त्यात एकसुत्रता असावी. यासाठी अधिकारी नेमून त्याचा पाठपुरावा करण्यात यावा. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावेत. खड्डे पडणार नाही याची दक्षताही घ्यावी, असे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी सांगितले. उड्डाणपुलाखाली डेब्रिज, सामान राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पुलांखालचा भाग स्वच्छ आणि मोकळा राहावा यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.
रस्त्यांच्या कामांमुळे राज्याच्या विकासात भर पडत असून नागरिकांची मोठी सोय होत आहे. मात्र टोल नाक्यांवर वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा दिसून येतात. नागरिकांना टोल देण्यासाठी तास-तासभर अडकून पडण्याची गरज नसल्याचे श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. टोल नाक्यांवरील ही गर्दी कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करा. लेनची संख्या वाढवा. हॅण्डहेल्ड मशीनधारकांची संख्या वाढवावी. विशेषत: सुटीच्या दिवशी मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग, दहीसर, वाशी या टोलनाक्यांवर मोठी गर्दी होते, असेही त्यांनी सांगितले.

कल्याण-शीळफाटा रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करा. रस्त्यांवर माती, डेब्रीज काढून टाका व रस्ते स्वच्छ आणि सुंदर करा. रस्त्यांच्या दुभाजकांवर असेल्या कुंड्यांना रंगरंगोटी करा असे निर्देशही श्री. शिंदे यांनी केले. पावसाळ्यामध्ये पुलांवर खड्डे पडतात त्यामुळे अपघात होऊ शकतात. अशा पुलांची तातडीने दुरुस्ती करावी, अशा सूचनाही श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या. 

Increase the number of lanes to reduce the queue on the toll lines

Public Works Minister Eknath Shinde directs 
Sanjay Patil: Mumbai: Mumbai - Pune Express Highway, Thane, Dahisar, Aeroli, Vashi, while directing the lanes to reduce lane on the toll lanes, the Maharashtra State Roads Development Corporation (MSRDC) reviewed all the flyovers in the state and said that their construction should be publicized. Minister Eknath Shinde made this here today.

A meeting of the Board of Directors of MSRDC was held. Minister at that time. Mr. Shinde was talking. At this time, Minister of State Sanjay Bansode, Managing Director of the Corporation Radheshyam Mopalwar, Co-Managing Director Vijay Waghmare, Co-Managing Director Dr. Chandrakant Pulkundawar, Chief Engineer Shashikant Sonantke were present.

The Minister reviewed the various development works being developed by the corporation at this time. Powered by Blogger. Emphasis should be given to their beauty while creating roads, bridges and flyovers. Plants should be planted on road dividers; The flyovers created by the corporation across the state should be reviewed. The colors of these bridges should be harmonious while emphasizing the beautification. For this, the officer should be appointed and pursued. Road pits should be extinguished. The public works minister also said that they should be careful not to fall into the pits. Be careful that the luggage is not luggaged under the flyover. Efforts should be made to keep the bridge area clean and open.
Road works are contributing to the development of the state and there is great convenience for the citizens. However, a large number of vehicles are seen on the toll knots. There is no need for people to get stuck for hours to pay the toll. Shinde said at this time. Take immediate measures to reduce this rush on toll noses. Increase the number of lanes. Increase the number of handheld machine holders. Especially on the holidays, the Mumbai-Pune Express Highway, Dahisar and Vashi were very crowded, he said.


Immediately complete the Kalyan-Shilpahata road. Remove the soil, debris on the roads and make the roads clean and beautiful. Shri also instructs that you paint the rings on the road dividers. Powered by Blogger. In the rainy season, bridges over the bridges can cause accidents. Shri also suggested that such bridges be repaired immediately. Shinde gave this time.
SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

0 comments: