संजय पाटील: नागपूर : शहरातील सिमेंट रस्त्यांच्या प्रकल्प कामात कसूर करणाऱ्या जे. पी. कन्स्ट्रक्शन कंपनीला मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एक वर्षासाठी काळ्या यादीत टाकले आहे. एकूण कार्यादेश रकमेच्या ०.२५ टक्के म्हणजेच ८ लाख ११ हजार ९६५ रुपयांचा दंडही ठोठावला आहे. मनपात पहिल्यांदाच कंत्राटदाराविरुद्ध अशी कारवाई झाली आहे. यापूर्वी आयुक्तांनी क्वालिटी कंट्रोलचे काम पाहणारी क्रिएशन इंजिनीअर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मनपाचे कनिष्ठ अभियंता श्रीवास्तव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
सिमेंट रस्ते प्रकल्प (टप्पा-३) रस्ता क्रमांक ३१ एकस्तंभ चौक ते उत्तर अंबाझरी रस्त्याचे (अजित बेकरी रोड) पेव्हर ब्लॉक मानकाप्रमाणे आवश्यक एम-४५चे नसल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालात आढळून आले. प्रत्यक्षात बसविण्यात आलेले पेव्हर ब्लॉक हे क्यूरिंग पिरेड पूर्ण होण्याआधीच लावण्यास सुरुवात केल्याचे निर्देशनास आले. या कामाच्या मोबदल्यात 'जे.पी.'ला ३२ कोटी ४७ लाख ८६ हजार १५१ रुपये अदा करायचे होते. मात्र कामात त्रुटी आढळल्याने आयुक्त मुंढे यांनी कंपनीला काळ्या यादीत टाकले. या कंपनीला यापूर्वी बृहन्मुंबई महापालिकेनेही काळ्या यादीत टाकले होते. त्यामुळे या कंपनीला काम देऊ नये, अशी मागणी अनेकांनी केली होती. या मागणीकडे दुर्लक्ष करीत कंपनीला निविदा प्रक्रियेत भाग घेण्याची मुभा मिळाली होती. पॅकेज १०मध्ये अनेक कामे या कंपनीला देण्यात आली होती. यात रामनगर चौक ते झेंडा चौक (गोकुळपेठ बाजार), उत्तर नागपुरातील जरीपटका परिसरात तसेच बोरगाव चौक ते सादिकाबाद सिमेंट रस्त्याचा समावेश आहे.
For no fault of theirs, citizens have to bear with bad roads, dust, narrow road as contractors have their own way of executing the civic works. Incidentally before posting of Tukaram Mundhe as new Municipal Commissioner there was no sight of any hurry of starting work on other stretch in front of Central Office of NMC. For long citizens were troubled by uneven road surface and faced even bigger problem while crossing over to other side where concrete road was already in place.
ReplyDelete