Thursday, 12 March 2020

पालकमंत्र्यांची मेयो, मेडीकल आणि विमानतळाला आकस्मिक भेट: कोरोना संशयित : संजय पाटील

SHARE
...


संजय पाटील : नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची व्यवस्था योग्य पद्धतीने होते किंवा कसे याची माहिती जाणून घेण्यासाठी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज मेयो, मेडिकल आणि विमानतळावर प्रत्यक्ष भेट देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. पालकमंत्र्यांच्या आकस्मिक भेटीने आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे.

याप्रसंगी माजी पालकमंत्री सतीश चतुर्वेदी, नागपूर महानगर पालिका विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, काँग्रेस अनुसूचित जाती समन्वयक राजेंद्र करवाडे तसेच मेयो रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया प्रामुख्याने उपस्थित होते.

सर्वप्रथम मेयो रुग्णालयाच्या आकस्मिक विभागातील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांसोबत त्यांनी आयसोलेशन वॉर्ड, औषध उपलब्धता, मास्क साठा आणि वापरलेल्या वस्तू नष्ट करण्याच्या प्रक्रियेबाबत माहिती घेतली. तसेच रुग्णांना देण्यात येणाऱ्या उपचाराबाबत विचारपूस केली. त्यानंतर मेडीकल रुग्णालयाच्या आकस्मिक विभागाला भेट देऊन सद्यस्थिती जाणून घेतली.

आज पावेतो एकूण 33 रुग्णांची चाचणी नागपुरात करण्यात आली असून, त्यामध्ये मेयोचे तीन रुग्ण मेडीकलचे तीन, अमरावतीचा एक व छत्तीसगड राज्यातील वीस आणि मध्यप्रदेश येथील सहा संशयित रुग्णांचा समावेश आहे. 33 पैकी एकही रुग्ण पॉझीटिव्ह नाही. कोरोना रुग्णांची चाचणी मेयो रुग्णालयात करण्यात येत असून चाचणीकरीता किमान पाच ते सहा तास लागत असल्याचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी सांगितले.

त्यानंतर नागपूर विमानतळावर भेट देवून कतार, शारजाह आणि दुबई येथील विदेशी प्रवाशी व पर्यटकांच्या स्क्रिनिंग चाचणीबाबत माहिती घेतली. विमानतळावर थर्मल कॅमेरा व स्कॅनरव्दारे तपासणी करण्यात येत असल्याचे विमानतळ व्यवस्थापक निखील यादव यांनी सांगितले.
SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

1 comment:

  1. Dr Nitin Raut, In-charge Minister for Nagpur district, made surprise visits to Government Medical College & Hospital (GMCH), Indira Gandhi Government Medical College & Hospital (IGGMCH) and Dr Babasaheb Ambedkar International Airport on Sunday and took review of the arrangements to deal with Coronavirus situation.

    Satish Chaturvedi, former minister, Tanaji Wanve, Opposition Leader in Nagpur Municipal Corporation, Rajendra Karwade, Congress ST Co-ordinator, and Dr Ajay Kewaliya, Dean of Mayo Hospital, were present. During visit to Mayor, Dr Raut took information from doctors in emergency deptt about isolation ward, availability of medicines, stock of masks, process of destroying used materials, treatment being given to patients etc. Then he visited GMC and took information. So far, exmaination of 33 patients, including three each from GMC, Mayo Hospital, one from Amravati, 20 from Chhattisgarh and 6 from Madhya Pradesh, has been done in the city so far.

    Of them, nobody was found with positive test. Dr Kewaliya informed that doctors examined Coronavirum affected persons in Mayo Hospital for which 5/6 hours are required. At Nagpur airport, Dr Raut took information about screening examination of passengers and tourists from Qatar, Sharjah and Dubai. Nikhil Yadav, Airport Manager, told that examination was being done with thermal camera and scan, says an official press note.

    ReplyDelete