Tuesday, 17 March 2020

आमदार निवासातील २१० खोल्या घेतल्या ताब्यात :थाईमान करोनाचे : संजय पाटील

SHARE




 संजय पाटील : नागपूर: करोना विषाणूसंदर्भात आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सुमारे दीड हजार नागरिकांची १४ दिवस कालावधीच्या सक्तीच्या एकांतवासासाठी आमदार निवाससह शासकीय व इतर इमारतीमध्ये विलगीकरण केंद्र स्थापित करण्यात आले आहे. त्यात आमदार निवास येथे २१० खोल्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

करोना: राज्यातील रुग्णांची संख्या ४१ वर

विलगीकरण केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, आरोग्य विभाग, विमानतळ अधिकारी तसेच महसूल विभागातील अधिकाऱ्यांना या बाबत जबाबदाऱ्यांचे वाटपही झाले असून आमदार निवासात पोलिस कक्षही सुरू झाल्याची माहिती, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी मंगळवारी दिली. आंतरराष्ट्रीय विमानतळावर दररोज येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता व्यवस्थेचा दैनंदिन आढावा घेतला जात आहे. गरज पडल्यास इतर शासकीय इमारतीमध्ये सुद्धा वाढ करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याचे आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी स्पष्ट केले.
करोनावर खबरदारीचा उपाय म्हणून उपराजधानीत सोमवारी रात्रीपासून जमावबंदी लागू झाली. येत्या ३१ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ती कायम राहणार आहे. नियम मोडल्यास एक ते सहा महिन्यांची शिक्षा किंवा दंडाची तरतूद आहे.

करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम यांनी कलम १४४नुसार जमावबंदीचे आदेश सोमवारी सायंकाळी जारी केले. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा, व्यावसायिक प्रदर्शन व शिबिर, पर्यटन, सभा, मेळावे, जत्रा, यात्रा, रॅली, धरणे, आंदोलन सर्व कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. यात एका ठिकाणी पाचहून अधिक नागरिकांनी राहू नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही कदम यांनी दिला आहे.

करोनाची लागण होऊ नये, यासाठी नागपूर पोलिसांनीही विशेष काळजी घेतली आहे. लग्नसमारंभ किंवा अंत्यविधी व त्यानंतर होणाऱ्या विधीसाठी हा आदेश लागू होणार नाही. यापूर्वी मॉल, जिम व चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आहेत. सोमवारी सकाळपासूनच पोलिसांनी चित्रपटगृहे, जिम, मॉल बंद आहेत किंवा नाही, याची झाडाझडती घेतली. याशिवाय लॉज व हॉटेल्सनाही विशेष काळजी घेण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. करोनाची लागण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून तसेच मानवी जीवितास निर्माण झालेली भीती, सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षेसाठी व सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना आवश्यक असल्याने हे आदेश काढण्यात आले.
जमावबंदी आदेश लागू झाला असला तरी फूटपाथवरील चहाठेले, पानठेले व दुकानांमधील गर्दीमुळे धोका होऊ शकतो. मात्र, ही प्रतिष्ठाने बंद करणे किंवा दुकानदारांविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार महापालिकेला आहे. शहरात जमावबंदी आदेश लागू झाल्यानंतर आता महापालिका कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

मंदिरेही बंद

जिल्हा प्रशासनानेही अधिक खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील धार्मिक स्थळेही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी रात्री १२ वाजतापासून पुढील आदेशापर्यंत मंदिरे व अन्य धार्मिक स्थळे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

नागरिकांनी खबरदारी घ्यावी : पोलिस आयुक्त

करोनाची लागण होऊ नये, यासाठी प्रत्येक नागपूरकराने काळजी घेणे आवश्यक आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदी करण्यात आली आहे. अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिला आहे.

First time a haul of 40 from Dubai to be quarantined at MLA Hostel



For the first time after Corona outbreak, city will witness a big haul of people from outside India to be quarantined. About 40 passengers who will be flown to Nagpur from Dubai early morning of Thursday will be quarantined at MLA hostel. As announced by Collector Ravindra Thakare, about 210 rooms have been kept ready at MLA hostel. Till yesterday there were seven countries from where if passengers arrive, they were to be quarantined.
On Monday, civic administration added three more countries namely USA, Saudi Arabia and Dubai. Otherwise Public Health Department was conducting thermal screening of the people arriving at Nagpur’s Dr Babasaheb Ambedkar International Airport by international flights--Air Arabia and Qatar Airlines. Recently, Government issued new guidelines according to which all the passengers coming from 10 countries are to be isolated as and when they land in India.
Arrangements have been made at MLA Hostel where these people will be kept. Meanwhile Mayor Sandip Joshi personally visited Indira Gandhi Government Medical College and Hospital (IGGMCH), Government Medical College and Hospital (GMCH) and enquired about the health of positive as well as suspects of corona. He also visited the home of first positive talked to his family members and assured them all help they need. Joshi appealed masses not to be panic and cooperate administration.
He also requested not to isolate families of the people who tested positive for corona or suspect socially as they have to undergo lot of sufferings. Dr Sanjeev Kumar, Divisional Commissioner on Tuesday convened a special meeting of senior officers wherein he informed everybody that 1,500 people can be accommodated for 14 days, quarantine period for Coronavirus. As per the guidelines of Central Government, passengers coming from outside the country are to be quarantined. District administration has made all the arrangements at the centres.
Nodal officers have been appointed at quarantined centres. Dr Sanjeev Kumar instructed all the officers to take all care of the people and nobody should face any problem. Officers of Public Works Department, Nagpur Municipal Corporation, Health Department, Airport should render their services. Meanwhile no new person in city detected positive. Eight more persons have been admitted as suspects. At present there are 16 persons admitted including four positive. Till now 104 samples are examined at the laboratory of Indira Gandhi Government Medical College and Hospital (IGGMCH). On Tuesday, 22 persons are screened at airport and seven out of them have been quarantined. With this, the total persons screened at Nagpur airport are 1,004. 
Government offices to remain open A confusion was created about the closure of Government offices in Maharashtra when a circular that was issued in the afternoon announced all Government offices, public transport including local, metro will remain closed. It was point of discussion among all the citizens. Later on after the Cabinet meeting Chief Minister Uddhav Thackeray announced Government offices, public transport system will remain open. Same kind of confusion was witnessed when Government issued circular of closing malls, gyms, swimming pools and theatres. Public Health Minister Rajesh Tope had announced all these four segments would remain closed. Afterwards Thackeray made it clear that only swimming pools and gyms would remain closed.

मुंबई: 'आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमानतळावर प्रवाशांचे स्क्रीनिंग करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तशी व्यवस्था रेल्वे स्थानकांमध्येही करण्यात यावी आणि सर्व रेल्वे प्रवाशांचेही स्क्रीनिंग करण्यात यावे, अशी विनंती आम्ही रेल्वे प्रशासनाला केली आहे. मात्र, त्याविषयी रेल्वे प्रशासनाने अद्याप आम्हाला कोणताही निर्णय कळवलेला नाही', अशी माहिती राज्य सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. त्याचवेळी 'करोना'च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार हरतऱ्हेचे उपाय करत असून राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील २१ विभागप्रमुखांची उच्चस्तरीय समिती त्यावर सातत्याने देखरेख करत आहे, असेही सरकारतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.

'करोना'च्या प्रश्नावर सागर जोंधळे यांनी अॅड. मिलिंद देशमुख यांच्यामार्फत, तर सागर सूर्यवंशी यांनी अॅड. सागर कुर्सीजा यांच्यामार्फत जनहित याचिका केली असून अॅड.सिद्धार्थ इंगळे यांनी हस्तक्षेप अर्ज केला आहे. या सर्वांवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व न्या. नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी एकत्रित सुनावणी झाली. त्यावेळी मुख्य सरकारी वकील प्रियभूषण काकडे यांनी सरकारतर्फे करण्यात आलेल्या सर्व उपायांविषयीची लेखी माहिती सादर केली आणि आत्तापर्यंतच्या सर्व 'जीआर'च्या प्रतीही सादर केल्या.

चाचणीसाठी सध्या तीन प्रयोगशाळा

संशयित रुग्णांच्या शरीरातील नमुन्यांची 'करोना'विषयी चाचणी करण्यासाठी सध्या मुंबईत कस्तुरबा रुग्णालय, पुण्यात नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हिरोलॉजी व नागपूरमध्ये इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज अशा तीन ठिकाणी प्रयोगशाळा आहेत. तसेच मुंबई शहरासाठी विलगीकरणाची सुविधा कस्तुरबा रुग्णालयात, तर मुंबई उपनगरांसाठी विलगीकरणाची सुविधा सेव्हन हिल्स रुग्णालयात आहे, अशी माहितीही सरकारतर्फे देण्यात आली.


आमदार निवास ‘हॉटस्पॉट’

नागपूर : आमदार निवासातील विलगीकरण कक्षात असलेल्या ज्या करोना संशयिताची पहिली चाचणी निगेटिव्ह येते, त्याचीच दुसरी चाचणी पॉझिटिव्ह येत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 'आमदार निवासातच जंतुसंसर्ग होत नाही ना?' अशी शंका व्यक्त केली जात आहे.
करोना संशयितांचे अथवा त्यांच्या संपर्कातील लोकांचे शहरातील विविध ठिकाणी विलगीकरण केले जाते. अधिकाधिक लोक हे आमदार निवासातील विलगीकरण कक्षात असतात. तेथील अनेकांना करोनाची लागण होत असल्याचे लक्षात येत आहे. विशेष म्हणजे, ज्या बाधिताचा पहिला अहवाल निगेटिव्ह येतो, त्याचा दुसरा किंवा तिसरा तपासणी अहवाल मात्र पॉझिटिव्ह येतो. याबाबत मेयोच्या डॉक्टरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. आमदार निवास परिसरात पुनर्जंतू संसर्ग (रिसायकल इन्फेक्शन) तर होत नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे तेथील कर्मचारी, अधिकारी यांनाही धोका होऊ शकतो. आमदार निवासांतील रिकामे विलगीकरण कक्ष बंद करून तेथे प्रतिजैविक व निर्जंतुकीकरण करणे अत्यावश्यक झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सतरंजीपुरा येथील सर्वच संशयित आमदार निवासांतील इमारत क्रमांक एक व दोनमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत. काहींचा विलगीकरणाचा अवधी पूर्ण झाला, त्यांना सुटी देण्यात आली. या खोलीत भरती होणाऱ्यांना बाधा होत असल्याचे निदर्शनास येत आहे. हा योगायोग आहे की काही कमतरता आहे, यावर चर्चा सुरू आहे.
दरम्यान, आमदार निवासांत कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची वैद्यकीय सुरक्षा साधने नाहीत. ते सुरक्षा साधनांचा वापर करतानाही आढळून येत नसल्याचेही चित्र आहे.
निर्जंतुकीकरणच नाही
बाधिताला सुटी झाल्यानंतर तातडीने त्याच खोलीत दुसरा रुग्ण ठेवण्यात येऊ नये, असे वैद्यकीय प्रमाण आहे. ती खोली अथवा कक्ष निर्जंतुकीकरण करणेही आवश्यक आहे. परंतु या खोल्या निर्जंतुकीकरण करण्यात आल्याच नसल्याचे दिसून येते.
कक्ष बंद करा
२१ दिवस पूर्ण झाल्यानंतर जर एखाद्या ठिकाणावरुन विलगीकरण करण्यात असलेल्या रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असेल तर असे विलगीकरण कक्ष तात्काळ बंद करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक असल्याचे साथरोग विभागात कार्यरत तज्ज्ञ सांगतात.
SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

2 comments:

  1. विविध देशातून दोहामार्गे नागपुरात आलेल्या सर्व १४ प्रवाशांना आमदार निवासातील विलगीकरण छावणीत ठेवण्यात आले आहे. दरम्यान कतार एअरवेजच्या दोहा नागपूर विमानाने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर आणखी २० प्रवासी नागपुरात दाखल होणार आहेत.

    परदेशातून करोना विषाणू बाधित प्रवासी नागपुरात येऊ नये म्हणून २२ मार्चपासून सर्व परदेशी उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. मात्र, तोपर्यंत येणाऱ्या कोणत्याही प्रवाशाला संसर्ग असू शकतो म्हणून त्यांना आमदार निवासात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण छावणीत १४ दिवस ठेवण्यात येणार आहे.

    कतार एअरवेजच्या (क्यूआर५९०) दोहा- नागपूर विमानाने गुरुवारी रात्री हे १४ प्रवासी नागपूर विमानतळावर आले. त्या प्रवाशांच्या उजव्या हातावर शिक्का लावून त्यांना आमदार निवासातील विलगीकरण छावणी नेण्यात आले. एअर अरेबियाचे (जी९४१६) शारजहाँ- नागपूर विमान रद्द करण्यात आले आहे. कालही हे विमान रद्द करण्यात आले होते, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे वरिष्ठ संचालक एम.ए. आबीद रुही यांनी दिली. दरम्यान, ६ई-७७४ एअर इंडियाचे दिल्ली-नागपूर विमान शुक्रवारी नागपुरात आले नाहीत. तसेच गोएअरचे जी८-२८३ पुणे- नागपूर विमान, जी८-१४२ मुंबई-नागपूर विमान, जी८-२५१९ दिल्ली- नागपूर विमान रद्द करण्यात आले. तरा इंडिगोचे ६ई-६६३ कोलकाता- नागपूर विमान पावणे दोन तास विलंबाने रात्री उशिरा येणार होते. शुक्रवारी कतार एअरवेजचे नागपूरहून दोहाला जाणारे क्यूआर५९१ नागपूर-दोहा विमान रद्द करण्यात आले. शिवाय गोएअरचे जी८-१४१ नागपूर-मंबई, जी८-२६०२ नागपूर मुंबई हे विमान रद्द करण्यात आले.

    ‘‘आज शारजहा येथून नागपूरसाठी विमान नाही. उद्या शनिवारी दोहा येथून सुमारे २० प्रवासी येण्याची शक्यता आहे.’’

    ReplyDelete
  2. नागपूर : विविध देशातून दोहामार्गे नागपुरात आलेल्या सर्व १४ प्रवाशांना आमदार निवासातील विलगीकरण छावणीत ठेवण्यात आले आहे. दरम्यान कतार एअरवेजच्या दोहा नागपूर विमानाने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर आणखी २० प्रवासी नागपुरात दाखल होणार आहेत.

    परदेशातून करोना विषाणू बाधित प्रवासी नागपुरात येऊ नये म्हणून २२ मार्चपासून सर्व परदेशी उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. मात्र, तोपर्यंत येणाऱ्या कोणत्याही प्रवाशाला संसर्ग असू शकतो म्हणून त्यांना आमदार निवासात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण छावणीत १४ दिवस ठेवण्यात येणार आहे.

    कतार एअरवेजच्या (क्यूआर५९०) दोहा- नागपूर विमानाने गुरुवारी रात्री हे १४ प्रवासी नागपूर विमानतळावर आले. त्या प्रवाशांच्या उजव्या हातावर शिक्का लावून त्यांना आमदार निवासातील विलगीकरण छावणी नेण्यात आले. एअर अरेबियाचे (जी९४१६) शारजहाँ- नागपूर विमान रद्द करण्यात आले आहे. कालही हे विमान रद्द करण्यात आले होते, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे वरिष्ठ संचालक एम.ए. आबीद रुही यांनी दिली. दरम्यान, ६ई-७७४ एअर इंडियाचे दिल्ली-नागपूर विमान शुक्रवारी नागपुरात आले नाहीत. तसेच गोएअरचे जी८-२८३ पुणे- नागपूर विमान, जी८-१४२ मुंबई-नागपूर विमान, जी८-२५१९ दिल्ली- नागपूर विमान रद्द करण्यात आले. तरा इंडिगोचे ६ई-६६३ कोलकाता- नागपूर विमान पावणे दोन तास विलंबाने रात्री उशिरा येणार होते. शुक्रवारी कतार एअरवेजचे नागपूरहून दोहाला जाणारे क्यूआर५९१ नागपूर-दोहा विमान रद्द करण्यात आले. शिवाय गोएअरचे जी८-१४१ नागपूर-मंबई, जी८-२६०२ नागपूर मुंबई हे विमान रद्द करण्यात आले.

    ‘‘आज शारजहा येथून नागपूरसाठी विमान नाही. उद्या शनिवारी दोहा येथून सुमारे २० प्रवासी येण्याची शक्यता आहे.’’

    ReplyDelete