कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्पोरेट क्षेत्राने सामाजिक उत्तरदायित्व निधीत (CSR)व इतर माध्यमातून मदत करावी
संजय पाटील : मुंबई : कार्पोरेट क्षेत्रातील मान्यवर नेहमीच राज्यातील अनेक संकटाच्या वेळी मदतीसाठी पुढे आले आहेत यावेळी ही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी व बाधित झालेल्या व्यक्तींसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे या अनुषंगाने अन्य कामासाठी कार्पोरेट क्षेत्राने सामाजिक उत्तरदायित्व निधीत (CSR) व इतर माध्यमातून मदत करण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
श्री. वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील कार्पोरेट क्षेत्राने नेहमीच राज्यावर येत असलेल्या प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी मदत केली आहे. सध्या देशात व राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा वेळी सरकार सर्वस्तरावर प्रयत्न करत आहे. जनता व सर्व क्षेत्रातील लोक सहकार्य करीत आहे त्याचप्रमाणे अशा आपत्तीच्या वेळी कार्पोरेट क्षेत्राने सामाजिक उत्तरदायित्व निधीत (CSR) व इतर माध्यमातून मदत करावी, असे आवाहन श्री. वडेट्टीवार यांनी केले.
|
Saturday, 21 March 2020
SHARE
Author: Journalist Sanjay Patil verified_user
I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM
0 comments: