Thursday, 23 April 2020

कुणीही उपाशी राहणार नाही,याची दक्षता घ्या, आवाहन भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले: संजय पाटील

SHARE



संजय पाटील : नागपूर :  'सध्याच्या करोनासंकटात व लॉकडाउनच्या काळात कुणीही उपाशी राहणार नाही, याची दक्षता घ्या,' असे आवाहन बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले. त्यांच्या आवाहनाला नागरिक प्रचंड प्रतिसाद देत आहेत. विद्यार्थी, बेघर, गरजू, गरीब आणि परप्रांतीय कामगारांना भोजन पुरविण्याची जबाबदारी इंदोरा बुद्धविहार कमिटीने स्वीकारली आहे. इंदोरा आणि परिसरातील दाते पुढे आले आहेत. त्यांनी दिलेल्या दानातून १० एप्रिलपासून सकाळ - सायंकाळी भोजनाची पाकिटे वाटण्यात येत आहेत.
'लॉकडाउनमुळे जगण्याचा आणि कुटुंबीयांना जगवण्याचा प्रश्न अनेक श्रमिकांसमोर निर्माण झाला आहे. कामधंदे बंद, धान्य संपले, आणि पैसेही. अशा स्थितीत पोट कसे भरणार? असे चित्र सर्वत्र आहे. अशा स्थितीत कुणीही उपाशी राहू नये, त्यांची काळजी घ्या. उपक्रम राबविताना शासनाच्या निर्देशांचे पालन करा,' असे आवाहन बौद्ध धम्म गुरू भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले. त्यांच्या आवाहनानुसार, इंदोरा बुद्धविहार कमिटीचे सचिव अमित गडपायले यांच्या पुढाकाराने भोजनाची पाकिटे वाटपाला प्रारंभ झाला. गडपायले, अरुण नागदिवे, नितीन गणवीर, अजय निकोसे, संदीप कोचे, विक्रांत गजभिये, मुकेश उके, सुहास राऊत, जगन तायडे यांनी १० एप्रिलपासून या उपक्रमाला सुरुवात केली. इंदोरा बुद्धविहारातून दररोज दानदात्यांना आवाहन केले जाते. दानदाते धान्य आणि रोख स्वरूपात दान करीत आहेत. त्यांच्या दानातून इंदोरा येथील नालंदा वसतिगृहात सकाळी व सायंकाळी भोजन तयार केले जात आहेत. निर्जंतुकीकरण केलेला परिसर, सुरक्षित अंतर, मास्क आणि ग्लोव्हज् घालून महिला भोजनाची पाकिटे तयार करतात. तयार पाकिटे कमिटीच्या वाहनातून गरजूंच्या घराघरांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे. भोजनाची पाकिटे तयार होत असलेल्या ठिकाणी जाऊन भदंत ससाई यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले आणि या कार्यात सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.
या सामाजिक उपक्रमात भास्कर धमगाये, संदीप कोचे, मुकेश उके, राजेश ढोक, जगन तायडे, राहुल डोंगरे, हर्षल राऊत, किशोर डोंगरे, संजय मेश्राम, नीतेश गोंडाणे, शंकर जाटव, अशोक हुमने, अभिषेक पाटील, बाबा डोंगरे यांच्यासह अनेकजण सहकार्य करीत आहेत.
SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

0 comments: