Sunday, 26 April 2020

अनिल देशमुख :" मृत पोलिसांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख, नोकरी" :स्वतंत्र करोना दक्षता कक्ष निर्माण : संजय पाटील

SHARE


संजय पाटील : नागपूर: करोना विषाणूच्या संसर्गामुळं मुंबईतील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. सरकार त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी ठामपणे उभं आहे. दोन्ही पोलिसांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपये मदत आणि सरकारी नोकरी, तसेच नियमानुसार मिळणारी मदत दिली जाईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. फेसबुकच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लढाईमध्ये आपले पोलीस दल अत्यंत कठीण अशा परिस्थितीत काम करत आहे. पोलिसांच्या पाठिशी सरकार ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही देशमुख यांनी दिली.

स्वतंत्र करोना दक्षता कक्ष निर्माण

करोना संदर्भात प्रकृतीची कोणतीही तक्रार असलेल्या पोलिसाला वा अधिकाऱ्याला तातडीने उपचार मिळावेत याकरिता एक स्वतंत्र करोना दक्षता कक्ष निर्माण करण्यात आला आहे. मुंबईसाठी सहपोलीस आयुक्त नवल बजाज तर, महाराष्ट्रासाठी अतिरिक्त महासंचालक संजीव सिंघल यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर देखील संबंधित पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक हे अशा प्रकारचे कक्ष निर्माण करतील. तसेच मुंबईमध्ये दोन हॉस्पिटल हे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.
SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

0 comments: