शाळेत पालकांकडून कोणत्याही प्रकारच्या फीची मागणी केली जाऊ नये."
संजय पाटील : नागपूर :"लॉकडाउनच्या काळात पालकांकडून कोणत्याही प्रकारच्या फीची मागणी केली जाऊ नये." शैक्षणिक मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेली ही माहिती राज्यातील शिक्षण विभागाला 30 मार्च 2020 रोजी देण्यात आलेल्या पत्रासाठी जाहीर केली आहे. जर कोणत्याही शाळेने फी मागितली असेल तर पालकांनी शालेय अधिकार्यांकडे तातडीने तक्रार करण्याचा अधिकार आहे. आणि शिक्षणाधिका .्यांनी हा नियम पाळला पाहिजे आणि शाळेविरूद्ध त्वरित कारवाई करावी असे त्या म्हणाल्या. करोना लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शाळांनी शुल्कआकारणीबाबत सक्ती करू नये, अशा सूचना नागपूर जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाने दिल्या आहेत. राज्य सरकारनेही यासंदर्भात या आधी आदेश दिले होते.
राज्यात ३ मेपर्यंत संपूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे, सर्व प्रकारची वाहतूक आणि हालचालींवर बंधने आली आहेत. या लॉकडाउनमुळे अनेक नागरिकांना पैशांचा तुटवडादेखील जाणवतो आहे. त्यामुळे, सर्व शाळांनी यंदाचे आणि येत्या वर्षाचे शालेय शुल्क गोळा करताना सक्ती करू नये आणि सहानुभूतीने विचार करावा, लॉकडाउनचा कालावधी संपल्यानंतर शाळांनी शुल्क आकारणीला प्रारंभ करावा, अशी विनंती प्राथमिक शिक्षण विभागाने केली. सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना हे आवाहन करण्यात आले आहे.
सेंट झेव्हियर्सची झाली तक्रार
अशाप्रकारची शुल्कआकारणीची सक्ती न करण्याबाबत राज्य शासनानेदेखील एक परिपत्रक काढले होते. तरीही नागपुरातील सेंट झेव्हियर्स शाळेने पालकांना शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरण्याबाबत संदेश पाठविले आहेत. आमदार कृष्णा खोपडे, मोहन मते आणि विकास कुंभारे यांनी प्राथमिक शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे. याबाबत संबंधित शाळेस निर्देश देण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी उपशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. सर्व शाळांनी शासन निर्देशांची अंमलबजावणि करावी आणि सक्तीने शुल्क आकारू नये, असे वंजारी यांनी आपल्या आदेशांमध्ये म्हटले आहे.
|
Friday, 17 April 2020
SHARE
Author: Journalist Sanjay Patil verified_user
I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM
0 comments: