सरकारकडून गेमबंदीसाठी प्रयत्न नाही
संजय पाटील : नागपूर : टाळेबंदीमुळे लोकांना घराबाहेर पडता येत नाही. शाळा व महाविद्यालयांनाही सुटी जाहीर झाल्याने मुलं घरीच असून दिवसभर मोबाईलवर ‘पब जी’ खेळत असल्याचे चित्र सर्वव्यापी आहे. ‘पब जी’ खेळण्यापासून मुलांना अडवल्यास मुले आई-वडील व पाल्यांवरच चिडचीड करीत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहे.
तरुणाई व अल्पवयीन मुलांमध्ये ऑनलाईन गेमचे प्रचंड वेड आहे. ऑनलाईन गेमसाठी अनेकांनी आत्महत्या केल्या असून उपराजधानीतही अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. पब जी गेमसाठी एका बारावीच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा एक गुन्हा बेलतरोडी पोलीस ठाण्यात काही महिन्यांपूर्वी दाखल करण्यात आला होता.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने राज्यात संचारबंदी व टाळेबंदी लागू केली आहे. या काळात शाळा व महाविद्यालयांना अनिश्चित काळासाठी सुटी जाहीर करण्यात आली. यामुळे शाळकरी मुले व महाविद्यालयीन तरुणाईसाठी ‘पब जी’ खेळण्यासाठी जणू लॉटरीच लागली आहे. सध्या दिवसरात्र मुले व मुली मोबाईलमध्ये ‘पब जी’ खेळत असतात. आई-वडिलांनी काही सांगितल्यास ऐकत नाहीत, आजी आजोबांवर चिडचिड करतात. ही परिस्थितीच जवळपास सर्वच घरांमध्ये बघावयास मिळत आहे.आमच्या शेजारच्या एकाने सांगितले की पब जी खेळण्यासाठी त्याचा भाऊ वेडा झाला आहे.आणखी एक म्हणाला, आपला मुलगा संपूर्ण रात्री जोरात आवाज देत आहे, या परिस्थितीचा सामना कसा करावा, असा प्रश्न लोकांना भेडसावत आहे. आपल्या नातवाचा अनुभव सांगताना एका वृद्ध व्यावसायिकाने ‘पब जी’ या गेमवर सरकारने बंदी आणावी, अशी मागणी केली. हे गेम बंद करावेत अशी मागणी करणारे लोक पब जी गेम धारकांवर, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी पैंट्सनी केली.यासंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी त्यांना संदेश पोहोचवून माहिती कळवतो, अशी प्रतिक्रिया दिली.
0 comments: