...
याप्रसंगी माजी पालकमंत्री सतीश चतुर्वेदी, नागपूर महानगर पालिका विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, काँग्रेस अनुसूचित जाती समन्वयक राजेंद्र करवाडे तसेच मेयो रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम मेयो रुग्णालयाच्या आकस्मिक विभागातील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांसोबत त्यांनी आयसोलेशन वॉर्ड, औषध उपलब्धता, मास्क साठा आणि वापरलेल्या वस्तू नष्ट करण्याच्या प्रक्रियेबाबत माहिती घेतली. तसेच रुग्णांना देण्यात येणाऱ्या उपचाराबाबत विचारपूस केली. त्यानंतर मेडीकल रुग्णालयाच्या आकस्मिक विभागाला भेट देऊन सद्यस्थिती जाणून घेतली.
आज पावेतो एकूण 33 रुग्णांची चाचणी नागपुरात करण्यात आली असून, त्यामध्ये मेयोचे तीन रुग्ण मेडीकलचे तीन, अमरावतीचा एक व छत्तीसगड राज्यातील वीस आणि मध्यप्रदेश येथील सहा संशयित रुग्णांचा समावेश आहे. 33 पैकी एकही रुग्ण पॉझीटिव्ह नाही. कोरोना रुग्णांची चाचणी मेयो रुग्णालयात करण्यात येत असून चाचणीकरीता किमान पाच ते सहा तास लागत असल्याचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी सांगितले.
त्यानंतर नागपूर विमानतळावर भेट देवून कतार, शारजाह आणि दुबई येथील विदेशी प्रवाशी व पर्यटकांच्या स्क्रिनिंग चाचणीबाबत माहिती घेतली. विमानतळावर थर्मल कॅमेरा व स्कॅनरव्दारे तपासणी करण्यात येत असल्याचे विमानतळ व्यवस्थापक निखील यादव यांनी सांगितले.
संजय पाटील : नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची व्यवस्था योग्य पद्धतीने होते किंवा कसे याची माहिती जाणून घेण्यासाठी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज मेयो, मेडिकल आणि विमानतळावर प्रत्यक्ष भेट देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. पालकमंत्र्यांच्या आकस्मिक भेटीने आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे.