Thursday 13 February 2020

"दर्जेदार व शाश्वत कामे करा" - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे- संजय पाटील

SHARE


सार्वजनिक बांधकाम विभागाचा घेतला आढावा

संजय पाटील : नागपूर :
 विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कामे सुरु आहेत. ही कामे आधुनिक तंत्राचा वापर करुन दर्जेदार व श्वाश्वत स्वरुपात करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज आढावा बैठकीत केली.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार सहायक मुख्य अभियंता एम. एस. बांधवकर, विशेष प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे, अधीक्षक अभियंता व्ही. डी. सरदेशमुख यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्य अभियंता श्री. देबडवार यांनी विभागाचे संगणकीय सादरीकरण केले. रस्ते, इमारतीच्या बांधकामाची बरीच कामे राज्यभरात सुरु आहेत. नागपूर विभागातील कामांची संख्याही मोठी आहे. कनिष्ठ अभियंत्याच्या भरतीमुळे कामांना गती आली असल्याची माहिती यावेळी मुख्य अभियंत्यांनी दिली. रस्ते विकास योजनेंतर्गत ३१ मार्च २०१९ पर्यंत ८९.५५ टक्के काम झाले असून याबाबत श्री. भरणे यांनी समाधान व्यक्त केले.

विभागाच्या अखत्यारितील नागपूर विभागीय प्रयोगशाळेला नॅशनल अक्रीडेशन बोर्ड फॉर टेस्टींग ॲण्ड कॅलीबरेशन लेबॉरेट्रीज (एनएबीएल) चे प्रमाणपत्र मिळाल्याने विभागातील दक्षता व गुणनियंत्रण पथकाच्या कामासाठी डॉ. नितीन टोणगावकर यांचा सत्कार श्री. भरणे यांनी यावेळी केला. चंद्रपुरातही प्रयोगशाळा सुरु असल्याची माहिती देण्यात आली.

वर्धा येथील सेवाग्राम विकास आराखडा व सैनिकी स्कूल चंद्रपूरच्या कामांची सद्य:स्थिती श्री.भरणे यांनी घेतली. विभागातील एकूण ६२ विश्राम गृहाकरिता सोलर रुफटॉप करण्याचे नियोजित असून या माध्यमातून ऊर्जा बचत व ऊर्जा संवर्धनाचा चांगला प्रयत्न होत असल्याने या कामाला गती देण्याचे निर्देश श्री. भरणे यांनी दिले.


Review of Public Works Department

Sanjay Patil : Nagpur: A large number of works are underway through the Public Works Department of the department. Minister of State for Public Works Dattatreya Bharne today directed to review these works in a quality and sustainable manner using modern technology.

Chief Engineer of Public Works Department Ulhas Debadwar Assistant Chief Engineer M. S. Bandhavkar, Executive Engineer of Special Project Satish Ambore, Superintending Engineer V. D. Sardarmukh including senior officers of the department were present on the occasion.

Chief Engineer Shri. Debdwar made computer presentation of the department. A lot of work on the construction of roads, buildings is underway across the state. The number of works in Nagpur division is also large. The Chief Engineer informed that the recruitment of the Junior Engineer has accelerated the work. Under the Road Development Scheme, as on March 31, 2019 , 89.55  percent work was done. Bharne expressed satisfaction.

The Nagpur Divisional Laboratory, under the aegis of the Department, received the certification of National Accreditation Board for Testing and Calibration Laboratories (NABL) by Dr. Nitin Tongaonkar was honored by Sh. Bharaya did this time. It was also informed that a laboratory was started in Chandrapur.


Mr. Bharane took up the current status of Sevagram Development Plan and Military School Chandrapur at Wardha. Solar rooftop is planned for a total of 62 rest houses in the department and through this efforts are being made to conserve energy and conserve energy. 
SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

0 comments: