Saturday 8 February 2020

"पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवा", गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निर्देश:संजय पाटील

SHARE

Image result for anil deshmukh


संजय पाटील : नागपूर : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविताना सिंचन क्षमता वाढविण्यासाठी काटोल व नरखेड  परिसरातील सर्व प्रकल्पासाठी विशेष आराखडा तयार कराअसे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिले.ग्रामीण भागातील जनतेला उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच जिल्हा परिषद यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय साधून उन्हाळ्यात पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.काटोल मतदारसंघातील विविध कामांचा त्यांनी आज रविभवन येथे आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे सभापती तसेच काटोल व नरखेड नगर परिषदेचे सभापतीउपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकरमुख्य अभियंतातहसीलदार तसेच सिंचनजलसंधारणपाणीपुरवठासार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषद तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.ग्रामीण भागातील गाळमुक्त धरणगाळयुक्त शिवार योजनेतून तलावाचा गाळ उपसण्यात यावाशेतीला तसेच पिण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन करावे. तसेच कार उपसासिंचन योजनेतून लगतच्या गावांना पाणीपुरवठा करणेप्रकल्पांची उंची वाढविणेकालव्या लगतच्या रस्त्याची दुरुस्ती करणेमदार नदीवरील 17 बंधारे दुरुस्तीसाठी नव्याने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी  दिल्या.झिलपी तलावलोहारी सावंगाखोरीजाम तलावांबाबतही सूचना करुन चिकडोहनवेगावमोवाड प्रकल्पाबाबत संबंधित खात्याकडून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. यासाठी राज्य शासन आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय साधावा. त्यासाठी सर्कल  निहाय प्रकल्पांना भेटी देण्याचे निर्देश श्री.देशमुख यांनी दिले.यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमुख्यमंत्री पेयजल योजनेतून काटोल शहराला नियमित पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने कामे करावीत. नवीन टाक्यांची निर्मिती आणि दुरुस्ती करावी. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी ग्रामीण रस्ते निर्मिती पांदण रस्तेरस्ते दुरुस्तीच्या कामांवर लक्ष देत  रस्ते बांधकाम उत्कृष्ट करण्याचे निर्देश दिले.कोंढाळी  आरोग्य उपकेंद्रामधील 108 रुग्णवाहिका कायम तत्पर ठेवावी. तसेच जिल्हा परिषदेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनासमाजकल्याणमहिला व बालकल्याणशिक्षण विभागअंगणवाडीबांधकाम योजनापालकमंत्री पांदण रस्ते योजनापशुसंवर्धन विभागाचा यावेळी आढावा घेतला.

SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

0 comments: