नागपूर: संजय पाटील: अयोध्यानगर येथील रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणप्रकरणी संबंधित एजन्सी अमृता कन्स्ट्रक्शनसह हनुमाननगर झोनचे कार्यकारी अभियंता अविनाश बारहाते, कनिष्ठ अभियंता लामसुंगे यांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
हनुमानननगर झोन क्र. ३ येथील प्रभाग क्र. ३२मधील हा रस्ता आहे. अयोध्यानगर येथे प्रतापसिंह चव्हाण यांच्या घरापासून ते तडस यांच्या घरापर्यंत १२ लाख रुपये निधी खर्च करून ३०० मीटर लांब रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण करण्यात आले. संपूर्ण काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास येताच आयुक्त मुंढे यांनी संबंधित एजन्सी व अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित एजन्सी अमृता कन्स्ट्रक्शनतर्फे सदर रस्त्याचे पूर्ण काम करण्यात यावे. तसेच सदर कामाची 'थर्ड पार्टी टेस्टिंग' करून पुढील प्रक्रिया करण्यात येईल, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
0 comments: