Friday, 20 March 2020

कर्फ्यू लागू केला तर बाहेर पडता येणार नाही : पालकमंत्री नितीन राऊत: संजय पाटील

SHARE

corona_1  H x W

संजय पाटील : नागपुरात सध्या करोनाचे चार पॉझिटिव्ह रुग्ण असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता आपण तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहोत. पुढील धोके टाळण्यासाठी आणि करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी नागपुरात लॉकडाऊन म्हणजे कर्फ्यू लागू शकतो, अशी शक्यता पालकमंत्री नितीन राऊत यांनी वर्तविली.


विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री नितीन राऊत यांनी करोनाचा प्रसार रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. करोना कसा रोखता येईल, यावरील उपाययोजनांवर यावेळी भर देण्यात आला. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी नागपुरात कर्फ्यू लागण्याची शक्यता वर्तविली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यासह प्रशासन आणि वैद्यकीय विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नागपुरातील शासकीय रुग्णालयांमध्ये ९० व्यक्ती दाखल होऊ शकतील एवढी व्यवस्था आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या चारही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यातील जवळच्या ४७ सहवासितांची तपासणी निगेटिव्ह आल्याचे राऊत यांनी सांगितले. ६८२ रुग्णांवर सध्या वॉच ठेवण्यात येत आहे. आतापर्यंत १४७ व्यक्ती रुग्णालयात दाखल करण्यात आल्या असून यापैकी १३७ व्यक्तींना सुट्टी देण्यात आली आहे. ३५ जणांवर १४ दिवसांचा वॉच ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विमानतळावर परदेशातून येणाऱ्या १०८५ जणांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. आमदार निवास येथे १४ जण सध्या दाखल असून येथे ४२० व्यक्तींना विलगीकरण करण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे राऊत यांनी सांगितले.
नागपुरात लॉकडाउन म्हणजे कर्फ्यू लागू केला तर बाहेर पडता येणार नाही. आजाराचा फैलाव रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्याची शक्यता असल्याचे राऊत यांनी सांगितले. लॉकडाउनमध्ये बाहेर गर्दी दिसेल तर पोलिस कारवाई करू शकतात, असेही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. आवश्यकतेनुसार विलगीकरण कक्ष, प्रयोगशाळेच्या सुविधेत वाढ, खासगी रुग्णालयांची मदतही घेतली जाऊ शकते.
टोल नाक्यांवर तपासणी करण्यात येत आहे. इतर शहरातील पॉझिटिव्ह रुग्ण शहरात येऊ नये यासाठीही खबरदारी घेण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवामात्र सुरू आहेत. महत्त्वपूर्ण कार्यालयातील उपस्थितीही २५ टक्के करण्यासंदर्भातील आदेश देण्यात आले आहेत. बनावट सॅनिटायझर बनविणाऱ्यांवरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे राऊत यांनी सांगितले. लोकांनी शक्यतो घरातच राहावे असे आवाहनही राऊत यांनी केले.

जनता कर्फ्यू आणि सिटीलॉकडाऊनमध्ये काय फरक?

देश संकटातून जात आहे. हे संकट युद्धासारखंच आहे असं गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. देशावर करोना व्हायरसचं संकट आहे. हा आजार संसर्गजन्य आहे. संपूर्ण जग या महामारीमुळे संकटात आहे. अद्याप तरी भारतात परिस्थिती नियंत्रणात आहे. पण आपल्या देशाची लोकसंख्या, लोकांचं राहणीमान पाहता आपल्याला जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. शहर, महानगरांमध्ये गर्दी टाळणे हे एक मोठं आवाहन आहे. त्यामुळे आपणच संसर्गापासून आपला बचाव करणं आणि इतरांचाही बचाव करणं हेच आपल्या हातात आहे. पंतप्रधान मोदींनी लोकांना रविवारी 'जनता कर्फ्यू'चं आवाहन केलं आहे. रविवारी २२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू लागू असेल. यासंदर्भात अधिक जाणून घेऊ...
कर्फ्यू म्हणजे अशी स्थिती ज्यात लोक केवळ घरातच राहतात. खूपच आणीबाणीची परिस्थिती आली तरच घराबाहेर पडतात. एखाद्या दंगलीच्या वेळी लोक रस्त्यावर येऊच नये म्हणून कर्फ्यू लावला जातो. परिस्थिती यामुळे नियंत्रणात येण्यास मदत होते. तसा हा आपणच आपल्यावर लादलेला कर्फ्यू आहे. हा जनता कर्फ्यू २२ मार्च २०२० रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ९ पर्यंत लागू असणार आहबे. या दरम्यान लोकांनी आपल्याला घरातच कोंडून घ्यायचं आहे.
देशात करोना विषाणूचं संकट आहे. आतापर्यंत करोनावर कोणत्याही प्रकारचं औषध वा लस शोधण्यात आलेली नाही. या आजारापासून वाचवण्याचा एकच उपाय आहे. लोकांनी सोशल डिस्टंट ठेवायचं आहे म्हणजेच समाजात मिसळण्यापासून स्वत:ला वाचवायचं आहे. आतापर्यंत या आजाराने भारतात रौद्र स्वरुप धारण केलेलं नाही. पण या टप्प्यावर सावधगिरी बाळगली तरच हा आजार नियंत्रणात राहू शकतो. असं केल्याने आपण स्वत:चा बचावही करू शकतो आणि इतरांचाही.
सोशल डिस्टन्सिंग हा जनता कर्फ्यूचा उद्देश तर आहेच, पण त्याचसोबत आणखी एक उद्देश आहे तो म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा. कृतज्ञता कोणाप्रति तर आपल्या आरोग्यासाठी जे दिवसरात्र राबत आहेत ते डॉक्टर, नर्सेस अन्य आरोग्य कर्मचारी, शासकीय कर्मचारी यांच्यासाठी. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केलं त्यानुसार, या दिवशी ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सायंकाळी पाच वाजता पाच मिनिटांसाठी लोकांनी आपल्या घराबाहेर, खिडक्यांमध्ये, बाल्कनींमध्ये यावं आणि कृतज्ञता म्हणून टाळ्या किंवा थाळ्या वाजवाव्यात.
जनता कर्फ्यू आणि साधारण कर्फ्यू यात मोठा फरक आहे. जनता कर्फ्यू लोकांना स्वत:हून उत्स्फूर्तपणे स्वत:वर लादून घ्यायचा आहे. त्यांनी घरातच राहायचे आहे. कोणत्याही अनावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडायचे नाही. हा कर्फ्यू प्रशासनाद्वारे लावला जाणार नाही. त्यामुळे नियम तोडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार नाही. साधारण कर्फ्यू दंगलसदृश्य स्थितीत लावला जातो. जनता कर्फ्यू संसर्गजन्य आजारापासून बचाव करण्यासाठी आहे. म्हणूनच लोकांनी स्वत:हून हा कर्फ्यू स्वत:वर लावून घ्यायचा आहे.
सिटी लॉकडाऊन आणि सामान्य कर्फ्यू यात खूप साम्य आहे. दोन्हीही प्रशासनाद्वारे लावले जातात. सिटी लॉकडाऊन म्हणजे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार बंद ठेवले जातात. परिणामी लोक कोणत्याही कामासाठी बाहेर पडण्याची शक्यता कमी होते. कर्फ्यूमध्ये जमावबंदी असते. पण जनता कर्फ्यू या दोन्ही कर्फ्यूंपासून वेगळा आहे. या जनता कर्फ्यूसाठी प्रशासनाकडून कोणताही दबाव नाही. हो, मात्र एक नैतिक दबाव जनतेवर नक्की असतो.

राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असून आतापर्यंत हा आकडा ५२ वर पोहोचला आहे. राज्य सरकारनं खबरदारी म्हणून, जीवनावश्यक सेवा वगळून मुंबई महानगर प्रदेशसह नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवडमधील सर्व दुकाने आणि कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बंदचा निर्णय ३१ मार्च नव्हे, तर पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत सांगितले.
लग्न समारंभ आणि अंत्यविधीसाठी गर्दी करू नका. लग्न समारंभाला वधू व वराकडील फक्त २५ लोक असावेत

बंदचे आदेश पुढील ३१ मार्चपर्यंत नव्हे; तर पुढील आदेश येईपर्यंत लागू राहतील
व्यापाऱ्यांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे

मुंबईसह पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्याचा सरकारचा मानस

रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना मालकांनी वेतन द्यावे

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांनी गर्दी केल्यास पीएमपीच्या मिनी बसेस सोडाव्या लागतील

पुढील पंधरा दिवस महत्त्वाचे आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे

ग्रामीण भागातील रुग्णालयेही तयार ठेवण्यात आली आहेत. नगरपंचायत आणि नगरपरिषदेला निधीची कमतरता भासणार नाही

विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना करोनाचा
प्रादूर्भाव रोखण्यासाठी खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत. याबाबतचे निर्बंध उठवण्यात आले आहेत

केंद्राकडे निधी मागण्याची गरज नाही. राज्य सक्षम आहे

निधीची अडचण कुणालाही जाणवू देणार नाही

संशयितांनी पळून जाऊ नये, डॉक्टरांचे ऐकावे

आर्थिक शिस्त
लावण्यासाठी ३१ मार्चपूर्वीचे व्यवहार करावे लागतील. मात्र काही बाबतीत मुभा दिली जाईल. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल

खासगी कंपन्यांनी काळजी घेतली पाहिजे. आर्थिक नुकसान महत्त्वाचे की माणूस न गमवणे महत्त्वाचे, याचाही विचार करावा

आरोग्याच्या खर्चासाठी तरतूद करण्यासंबंधी शासन निर्णय जाहीर करणार
व्यापाऱ्यांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे

मुंबईसह पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्याचा सरकारचा मानस

रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना मालकांनी वेतन द्यावे

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांनी गर्दी केल्यास पीएमपीच्या मिनी बसेस सोडाव्या लागतील

पुढील पंधरा दिवस महत्त्वाचे आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे

ग्रामीण भागातील रुग्णालयेही तयार ठेवण्यात आली आहेत. नगरपंचायत आणि नगरपरिषदेला निधीची कमतरता भासणार नाही

विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना करोनाचा
प्रादूर्भाव रोखण्यासाठी खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत. याबाबतचे निर्बंध उठवण्यात आले आहेत

केंद्राकडे निधी मागण्याची गरज नाही. राज्य सक्षम आहे

निधीची अडचण कुणालाही जाणवू देणार नाही

संशयितांनी पळून जाऊ नये, डॉक्टरांचे ऐकावे

आर्थिक शिस्त
लावण्यासाठी ३१ मार्चपूर्वीचे व्यवहार करावे लागतील. मात्र काही बाबतीत मुभा दिली जाईल. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल . खासगी कंपन्यांनी काळजी घेतली पाहिजे. आर्थिक नुकसान महत्त्वाचे की माणूस न गमवणे महत्त्वाचे, याचाही विचार करावा

आरोग्याच्या खर्चासाठी तरतूद करण्यासंबंधी शासन निर्णय जाहीर करणार
राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असून आतापर्यंत हा आकडा ५२ वर पोहोचला आहे. रुग्णांच्या वाढणाऱ्या आकड्याबरोबर राज्यातील नागरिकांची काळजीही वाढत आहे. सुरुवातीच्या थट्टेची जागा आता गांभीर्यानं घेतली आहे. राज्य सरकार व स्थानिक प्रशासनांच्या सूचनांमुळं लोक आता स्वत:हून काळजी घेताना दिसत आहेत.



SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

3 comments:

  1. Though the essential services will continue to operate, several ‘social distancing’ measures also have been put into effect by the administrative authorities as well as the society, to fight Coronavirus. Dr Nitin Raut, Guardian Minister of district, asked the people to use WhatsApp or e-mail to get in touch with him instead of meeting in person.

    ReplyDelete
  2. “Every citizen must follow the instructions issued by the Central and State Governments, and local administration to combat Coronavirus scare. People should avoid visiting my camp office at Ravi Bhavan Cottage No 5 and Bezonbagh Camp Office till March 31,” he stated in a press release. Barring the urgent matters, people should send their memorandums, complaints, suggestions to WhatsApp numbers 9970283011, 9766393888, or 9421717247 or e-mail those to guardianministerngp@gmail.com, Dr Raut stated in a press release. He appealed to the people to mention their mobile phone number on the memorandums, complaints, suggestions sent to the above-mentioned numbers/e-mail id. People may also get in touch with Dr Raut’s office by dialling following numbers -- Ravi Bhavan (0712-2553557) or Bezonbagh Camp Office (0712-2631111).

    ReplyDelete
  3. 'नागपुरात सध्या करोनाचे चार पॉझिटिव्ह रुग्ण असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता आपण तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहोत. पुढील धोके टाळण्यासाठी आणि करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी नागपुरात 'कर्फ्यू' लागू शकतो', असे संकेत पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले.

    विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्र्यांनी करोनाचा प्रसार रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. करोनाला कसे रोखता येईल, याबाबतच्या उपाययोजनांवर यावेळी भर देण्यात आला. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत राऊत यांनी नागपुरात कर्फ्यू लागण्याची शक्यता वर्तविली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यासह प्रशासन आणि वैद्यकीय विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    ४७ अहवाल निगेटिव्ह

    नागपुरातील शासकीय रुग्णालयांमध्ये ९० व्यक्ती दाखल होऊ शकतील, एवढी व्यवस्था आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या चारही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यातील जवळच्या ४७ सहवासितांची तपासणी निगेटिव्ह आल्याचे राऊत यांनी सांगितले. ६८२ रुग्णांवर सध्या वॉच ठेवण्यात येत आहे. आतापर्यंत १४७ व्यक्ती रुग्णालयात दाखल करण्यात आल्या असून यापैकी १३७ व्यक्तींना सुट्टी देण्यात आली आहे. ३५ जणांवर १४ दिवसांचा वॉच ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विमानतळावर परदेशातून येणाऱ्या १,०८५ जणांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. आमदार निवास येथे १४जण सध्या दाखल असून येथे ४२० व्यक्तींना विलगीकरण करण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे राऊत यांनी सांगितले.

    काय होईल?

    नागपुरात कर्फ्यू लागू केला तर बाहेर पडता येणार नाही. आजाराचा फैलाव रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्याची शक्यता असल्याचे राऊत यांनी सांगितले. कर्फ्यूमध्ये बाहेर गर्दी दिसली तर पोलिस कारवाई करू शकतात, असेही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. आवश्यकतेनुसार विलगीकरण कक्ष, प्रयोगशाळेच्या सुविधेत वाढ, खासगी रुग्णालयांची मदतही घेतली जाऊ शकते.

    टोलनाक्यांवर तपासणी

    टोलनाक्यांवर तपासणी करण्यात येत आहे. इतर शहरांतील पॉझिटिव्ह रुग्ण शहरात येऊ नयेत, यासाठीही खबरदारी घेण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा मात्र सुरू आहेत. महत्त्वपूर्ण कार्यालयांतील उपस्थितीही २५ टक्के करण्यासंदर्भातील आदेश देण्यात आले आहेत. बनावट सॅनिटायझर बनविणाऱ्यांवरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे राऊत यांनी सांगितले. लोकांनी शक्यतो घरातच राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

    सामसूम...

    नागपुरात लॉकडाउन लागू होण्यापूर्वीच शहरातील रस्ते सामसूम झाले आहेत. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनीही स्वत:हून आता पुढाकार घेतला असल्याचे चित्र शहराच्या विविध भागांत पाहायला मिळाले. एरवी पाय ठेवायलाही जागा नसलेल्या महालच्या बाजारपेठेत शुकशुकाट दिसला.

    ReplyDelete