संजय पाटील : नागपूर : पंतप्रधान गरीब कल्याण अन्नयोजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांसाठी तांदूळ मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. १ एप्रिलपासून धान्य मिळणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप धान्य पॉस (पीओेएस) मशिनवर आले नसल्याने धान्य असूनही लाभार्थ्यांना परत जावे लागत आहे.
करोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी देण्याचा निर्णय घेऊन चार दिवस होत नाही तोच शासनाने निर्णय बदलविला. योजना खऱ्या अर्थाने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी आता केवळ एक महिन्यांचेच धान्य राशन धान्य दुकानातून देण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत देण्यात येणार असल्याची खूशखबरही शासनाकडून देण्यात आली होती. १ एप्रिलपासून मोफत धान्य लाभार्थ्यांना मिळणे अपेक्षित होते, मात्र पॉस मशिन अपडेट नसल्याने राशन धान्य दुकानातून लाभार्थ्यांना परत जावे लागत आहे.
हा विरोधाभास का ?
शक्यतो आपल्या घरातून बाहेर पडू नका असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. मात्र धान्य घेण्यासाठी राशन धान्य दुकानात गेलेल्यांना तांत्रिक कारण सांगून परत पाठविले जात असल्याने लाभार्थ्यांना पुन्हा पुन्हा घराबाहेर पडावे लागेल. त्यामुळे नागरिकांना वारंवार घराबाहेर पडण्याची गरजच पडू नये, असा रोष इसासनी ग्रामपंचायत सदस्य प्रीती राऊत आणि सामाजिक कार्यकर्त्या अॅड. स्मिता कांबळे, पत्रकार संजय पाटील यांनी व्यक्त केला.
धान्य वितरणाला हवा वेग
अंत्योदय गटात दर महिन्याला १५ किलो गहू आणि २० किलो तांदूळ असे एकूण ३५ किलो धान्य देण्यात येईल. प्राधान्य गटात महिन्याला ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ असे एकूण ५ किलो धान्य देण्यात येणार आहे. अंत्योदय गटातील लाभार्थ्यांना १ साखरही देण्यात येणार आहे. २० रुपये किलो दराने साखर देण्यात येणार आहे. राशन धान्य दुकानात धान्य उपलब्ध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असताना नागरिकांना परत का पाठविला, असा प्रश्न लाभार्थ्यांनी उपस्थित केला.
0 comments: