Tuesday, 12 May 2020

अवैध रस्त्यातून ट्रक ची ने आन, पाईपलाईन फुटून सांडपाणी वाहाते :संजय पाटील

SHARE

संजय पाटील : नागपूर : बुधवार बाजार रोड कपिल नगर नारी रोड नागपूर -26, येथिल बूधवार बाजार रोडवर मागिल 3 वर्षात शासनाला तक्रार करून साईड ड्रेन बनविण्यात आली आहे, परंतु जवळच असलेल्या दोन ट्रक रिपेयरिंग गॅरेज द्वारे या ड्रेन वरून ट्रकची ने आण करित आहेत त्यामूळे ती ड्रेन तु तटून घाण पाणी वाहत आहे, या घाण पाण्यामूळे येथिल नागरिकांचे स्वास्थ धोक्यात आहे . आधिच संपूर्ण भारतात कोरोणाचे संकट शूरू आहे, त्यातल्या त्यात महाराष्ट्रात तर जास्तच आहे, महत्वाची गोष्ट नागपूरात नागपुरात अगदी आटोक्याबाहेरच परिस्थिती समजावी . या ड्रेनवरून ट्रकची ने आण होत असल्याने खालीत पाईपलाईन फूटली आणि तेथून घाण पाणी सांडपाणी वाहत आहे तरी मा . एन एमसी कामिशनर साहेब या गॅरेजधारका विरूद्ध कार्यवाही करून त्यांच्या व ड्रेन दुरुस्तीचा खर्च वसूल करून , त्यांचे वर कार्यवाही करून त्यांना ताकिद देतील काय? की व्ययक्तिक स्वतःच्या काम करण्यासाठी येथिल लोकाना या त्रासापासून मूक्त करून त्यांच्यावर कार्यवाही करतिल हे गॅरेजस् संपूर्ण लॉक डाऊन असंताना सुधा शूरूच आहेत. घाण पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.या समस्येकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. या भागातील नागरिक सातत्याने ही समस्या सुटावी यासाठी पाठपुरावा करीत आहे. मात्र मनपा नागरिकांच्या तक्रारीकडे लक्ष देईनासे झाले आहे. पाणी एकाच जागी साचल्यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते. म्हणून प्रशासनाने यांची दक्षता घ्यावी .

SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

0 comments: