संजय पाटील : नागपूर: नागपुरात करोना रुग्णांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लॉकडाऊनचे नियम अधिक कडक केले आहेत. राज्यात कंटेन्मेट झोन वगळता दारू विक्रीला सरकारने परवानगी देण्यात आलेली असतानाच मुंढे यांनी मात्र, नागपुरात दारू विक्रीली परवानगी नाकारली आहे. तसेच लग्नकार्यात केवळ ५० तर अंत्यसंस्काराला केवळ २० लोक उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. त्याशिवाय शहरात कोणतेही उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागपूरकरांना १७ मेपर्यंत कडक निर्बंधांचं पालन करावं लागणार आहे.
केंद्राने वाढविलेल्या लॉकडाऊनदरम्यान नवी नियमावली जारी केली आहे. यात ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये शिथिलता असली तरी रेड झोनमध्ये असलेले निर्बंध कायम आहेत. जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू राहील. रेड झोनमधील दारू दुकाने सुरू करण्यासंदर्भात केंद्राने राज्य सरकारकडे निर्णयाचा चेंडू टोलवला आहे. सरकारी कार्यालय व खासगी कार्यालयात ३० टक्के कर्मचाऱ्यांसह कामकाज करता येईल. शहरातील उद्योग बंदच राहतील. मात्र, बांधकामांना काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे. यात बांधकामाच्या ठिकाणीच मजुरांच्या निवासाची व्यवस्था करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशा ठिकाणी मजुरांना काम करताना मास्क देण्याचे व इतर नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे बजावण्यात आले आहे. नियमभंग करण्यात आल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान व तंबाखू सेवनावर बंदी घालण्यात आली आहे. यापुर्वी प्रमाणेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडात्मक कारवाई होईल, असा इशारा या परिपत्रकात म्हटलं आहे.
मुंबई, पुणे, मालेगाव व पिंपरी चिंचवडप्रमाणे नागपूर शहर रेड झोनमध्ये आहे. करोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लॉकडाउन काळात १७मे पर्यंत नागपूरकरांना या व इतर अटींची कळ सोसावी लागेल. मात्र, त्यानंतरही करोना रुग्णांची संख्या वाढत राहील्यास त्यानंतर केंद्र व राज्य सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नियमांमध्ये बंधने घालण्यात येतील, असे संकेत आहेत.
मुंबई, पुण्यात कंटेन्मेंट क्षेत्र वगळता दारूची दुकानं खुली होणार
मुंबई: लॉकडाऊनच्या काळात रेड झोनमध्ये समावेश असलेल्या मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यांतील कन्टेंन्मेट क्षेत्र वगळता उर्वरित भागांत स्वतंत्र दुकानांसह दारुची दुकानंही खुली होणार आहेत. राज्य सरकारनं यासंबंधी निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळं मद्यप्रेमींना दिलासा मिळाला आहे.
करोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळं केंद्र आणि राज्य सरकारनं लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. १७ मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. त्याचवेळी सरकारनं रेड, ऑरेंज, ग्रीन अशा श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. महाराष्ट्रात १४ जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. या रेड झोनमधील दुकानं उद्यापासून खुली होणार आहेत. मुंबई आणि पुणे महानगर क्षेत्रासह इतर जिल्ह्यांतील कन्टेंन्मेंट क्षेत्र वगळता दारूची दुकानंही खुली होणार असून, विक्रीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे.
>> रेड झोनमधील कन्टेंन्मेंट क्षेत्रात दारू दुकाने खुली ठेवण्यात अजिबात परवानगी नाही.
>> प्रत्येक लेनमध्ये केवळ पाच दुकाने (जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता, माल आणि बाजारपेठांमधील नाहीत.) खुली ठेवण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे.
>> जीवनावश्यक वस्तूंची दुकानं खुली ठेवण्यावर बंधन नाही. सर्वच दुकानदारांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागेल.
>> स्वतंत्र मद्याची दुकानं खुली ठेवता येणार आहेत. रेस्तराँ किंवा मॉलमधील दारूची दुकानं खुली ठेवता येणार नाहीत.
>> सलून खुले ठेवता येणार नाहीत.
>> परिस्थितीनुसार, स्थानिक प्रशासनांनी त्यांच्या पातळीवर दुकाने खुली ठेवण्याच्या वेळा निश्चित करावयाच्या आहेत.
0 comments: