![Parboiled (Converted) Rice: Nutrition, Benefits, and Downsides](https://i0.wp.com/images-prod.healthline.com/hlcmsresource/images/AN_images/parboiled-rice-1296x728-feature.jpg?w=1155&h=1528)
गोंदिया : नागपूर 19 मे 2020 : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांधमधील एका स्वस्त धान्य दुकानदाराला खमारीच्या माया राईस मिलर्सकडून तांदळाचा पुरवठा करण्यात आला. हे तांदूळ निकृष्ट असल्याची तक्रार करण्यात आली. पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत साडेसात क्विंटल तांदूळ निकृष्ट आढळला. ट्रकभर तांदळात मोजकाच तांदूळ निकृष्ट कसा निघाला यावरून संशय व्यक्त केला जात आहे.
करोनाच्या संकटात गरजूंना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्य वितरणाची घोषणा करण्यात आली. त्याचे वाटपही सुरू करण्यात आले. १६ मे रोजी नवेगावबांध येथील काही लाभार्थी रेशन दुकानात धान्य घेण्यासाठी गेले असता त्यांना खंडामिश्रित निकृष्ट तांदूळ देण्यात आले. या तांदळाचा पुरवठा खमारी येथील माया राईस मिलर्सकडून करण्यात आला होता. सरपंचांनी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसीलदार विनोद मेश्राम यांना माहिती दिली. त्यानंतर गोदाम किपर मोहर्ले यांना चौकशीकरिता पाठविण्यात आले. चौकशीत केवळ साडेसात क्विंटल तांदूळ निकृष्ट आढळला. स्वस्त धान्य दुकानांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवठा करणाऱ्या संबंधित माया राईस मिलच्या मालकावर त्वरित गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी नवेगावबांधवासियांनी केली आहे. अन्न सुरक्षा कायद्यानुसार अशा प्रकारात गुणवत्ता नियंत्रक आणि पुरवठादार दोषी आढळल्यास त्यांच्यावर कलम ३४० अंतर्गत कारवाईची तरतूद आहे.
'निकृष्ट दर्जाचे आढळलेले साडेसात क्विंटल तांदूळ गोदामात परत जमा करण्यात आले. त्याऐवजी रेशन दुकानदाराला तेवढेच धान्य पुरवठा करण्यात आले. सोमवारपासून नियमित धान्य वितरण करण्याची सूचना दुकानदाराला दिली आहे. चौकशी अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी गोंदिया यांना सादर करण्यात येणार आहे,' अशी माहिती पुरवठा निरीक्षक अधिकारी विनोद काळे यांनी दिली. दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
बोरगावचे दुकान रद्द, गोंदेखारीचे अधिकार काढले
गोरेगाव तालुक्यातील बोरगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार अशोक मेश्राम यांनी लाभार्थ्यांना पावती न देता कमी धान्य दिल्याची तक्रार करण्यात आली होती. तक्रारीत तथ्य आढळल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दुकानदाराचा परवाना रद्द केला. त्याचप्रमाणे गोंदेखारी येथील दुकानदार श्रीराम ठाकरे यांच्यावरदेखील आरोप झाले होते. तालुका पुरवठा निरीक्षक मिर्जा यांनी चौकशी केली असता आरोपात तथ्य आढळल्याने गोंदेखारी येथील दुकानाचे अधिकार काढण्यात आले.
कुही गाव : धन्याचे वाटपावरुन मोठा घोटाळा
कुहि गावतून मोठ्या प्रमाणात रशिनिंगच्या वाटपावरुन तिथल्या लोकांचं आक्रोश वाढत आहे .आमच्या निर्देशनास आले आहे . तिथिल्या नगरीकाना सांगिताले शाशन याची दखल घेतील काय आसा प्रार्थना. तिथिल्या नगरीक करीतआहे.
0 comments: