संजय पाटील : नागपूर प्रेस मीडिया : 20 जून 2020 : नागपूर : वेतनवाढ व सुविधेच्या मागणीवरून कचरा संकलन करणारी कंपनी एजी एन्व्हॉयरोचे कर्मचारी सोमवारी संपावर गेले. यामुळे अर्ध्या शहरातील कचरा उचलण्यातच आला नाही. बैद्यनाथ चौकातील कंपनीच्या कार्यालयासमोर या कर्मचाऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर कामगार आयुक्त कार्यालयात जाऊन तक्रार करण्याची भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली. वारंवार होणाऱ्या या प्रकारावर मनपाने नाराजी व्यक्त करीत, 'तातडीने प्रकरण निकाली काढून कामास सुरुवात करा', असा दम कंपनीला दिला.
बुधवार बाजार रोड, कपिल नगर, नारी रोड, नागपूर येथे बुधवार दिवशी बाजारपेठ आहे, दुसर्या दिवशी गुरुवारी रस्त्यावर कचराकुंडी आहे.आमची इच्छा आहे की नागपूर महानगर पालिका त्यांना विक्री करायला आलेल्या लोकांना नोटीस द्यावी, तुमची विक्री झाल्यावर त्यांनी जण्यापूर्वी जागा स्वच्छ करावी. लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली आणि नेहरूनगर या पाच झोनमधील घराघरांत कचरा संकलनाची जबाबदारी व ते डम्पिंग यार्डपर्यंत वाहतुकीची जबाबदारी एजी एनव्हॉयरो कंपनीकडे आहे. गेल्या सहा महिन्यांपासून वेतन, सुटी व सुविधांबाबत करण्यात आलेल्या मागणीवर केवळ आश्वासने मिळाली. मागणी मात्र अपूर्णच राहिली. त्यामुळे सोमवारी कर्मचाऱ्यांनी सकाळीच कंपनीचे कार्यालय गाठून कामबंद आंदोलन केले. नियमानुसार, वेतनवाढ व महिन्यातून किमान दोन सुट्या द्याव्यात, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. शिवाय, इतर सुविधाही द्याव्यात, याकडेही कर्मचाऱ्यांनी लक्ष वेधले.
एजी एन्व्हॉयरो कंपनी ज्या भागात कचरा संकलन करते, त्या भागात सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थात्मक विलगीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. सिम्बायोसिस, व्हीएनआयटी, वनामती आणि आमदार निवास येथे सध्या विलगीकरणात नागरिक आहेत. मे महिन्यातही कर्मचाऱ्यांनी कर्मचारी कपातीच्या मुद्द्यांवरून आंदोलन केले होते. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, २६ जानेवारी व १ मे या महत्त्वपूर्ण दिनाच्या सुट्याही कंपनीने दिल्या नाहीत. केवळ २६ दिवसाचा वेतन काढण्यात येतो. हक्काप्रमाणे किमान महिन्यातून दोन वेतनरजा देण्यात यावी तसेच इतर कर्मचाऱ्यांची कपात न करता, जोखमीचे काम असल्याने इतर साहित्य व सुविधाही देण्यात याव्यात, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
-तर कंपनीला नोटीस
'अधूनमधून कारणे पुढे करीत कचरा संकलन करणाऱ्या कर्मचारी आंदोलन करतात. कंपनीने यावर तोडगा काढावा. शहरातील कचरा संकलनाचे काम थांबू नये, असे व्यवस्थापनास बजावण्यात आले आहे. तशी नोटीस देऊ, प्रसंगी दंडही आकारू', असा इशारा उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) डॉ. प्रदीप दासरवार यांनी कंपनीला दिला आहे.
0 comments: