व्हेटिलेटर्स खरेदीत केंद्र सरकारनं घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.(फोटो -काँग्रेस ट्विटर हॅण्डल)पीएम केअर फंडातून करोना रुग्णांवर उपचारासाठी वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यात आलं आहे. या साहित्य खरेदी घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. भाजपाचं गणित कच्च आहे की, यातही काही डाव आहे?,” असं म्हणत “केंद्र सरकारनं दीड लाखांच्या व्हेटिलेटरसाठी अडीच लाख रुपये जास्तीचे खर्च का केले?,” असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला आहे.
संजय पाटील : नागपूर प्रेस मीडिया 7 : 7 : 2020 : देशात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर आरोग्य सुविधांवर ताण पडला होता. त्याचबरोबर करोना रुग्णांवर उपचारासाठी लागणाऱ्या साहित्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. करोनाच्या युद्धात वेगवेगळ्या स्थरावर काम करण्यासाठी मोदी सरकारनं पीएम केअर फंड सुरू केला होता. करोनाविरुद्धच्या लढाईसाठी आर्थिक योगदान देण्याचं आवाहन केंद्र सरकारनं केलं होतं.
पीएम केअर फंडातून खरेदी करण्यात आलेल्या व्हेटिलेटर्संच्या व्यवहारावर काँग्रेसनं शंका उपस्थित करत. घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. “पीएम केअर व्हेटिलेटर्स घोटाळ्यावर प्रश्न आहे. प्रत्येक व्हेटिलेटर्ससाठी सरकारनं ४ लाख रुपये खर्च केले आहेत. पुरवठा करणाऱ्यानं व्हेटिलेटर्सची किंमत दीड लाख नोंदवली आहे. मग केंद्र सरकारनं प्रत्येक व्हेटिलेटर्सवर अडीच लाख रुपये जास्तीचे खर्च का केले? भाजपाचं गणित कच्च आहे की, यातही काही डाव आहे?,” असा आरोप काँग्रेसनं केला आहे.
पीएम केअर फंडात अनेकांनी पुढे येत आपापल्या परीनं मदत केली होती. पीएम केअर फंडाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या निधीतून केंद्र सरकारनं वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसह रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची खरेदी केली. यात पीपीई किट, मास्क, व्हेटिलेटर्ससह इतर साहित्य आहे.
|
Monday, 6 July 2020
SHARE
Author: Journalist Sanjay Patil verified_user
I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM
0 comments: