Thursday, 30 April 2020

प्रकाश आंबेडकर : "मुंबई, पुण्यातील लोकसंख्या कमी करा" : संजय पाटील

SHARE
prakash-ambedkar

संजय पाटील : पुणे: राजस्थानातील कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने परत महाराष्ट्रात आणले, हे एक चांगले काम झाले आहे. मात्र, यात काही नियोजन असल्याचे दिसून आले नाही, असं सांगतानाच राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर मुंबई, पुण्यासारख्या करोनाचा प्रचंड प्रादुर्भाव असलेल्या शहरातील लोकसंख्या ३० टक्के कमी करावी किंवा येथील नागरिकांचं गावाकडे स्थलांतर केल्यास करोनावरती नियंत्रण मिळवता येईल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.

राजस्थानातील कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने परत महाराष्ट्रात आणले, हे एक चांगले काम झाले आहे. मात्र, यात काही नियोजन असल्याचे दिसून आले नाही, असं सांगतानाच राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर मुंबई, पुण्यासारख्या करोनाचा प्रचंड प्रादुर्भाव असलेल्या शहरातील लोकसंख्या ३० टक्के कमी करावी किंवा येथील नागरिकांचं गावाकडे स्थलांतर केल्यास करोनावरती नियंत्रण मिळवता येईल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.


राज्यातील दाट वस्ती असलेल्या अनेक भागात करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबाडेकर यांनी सरकारला काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. मुंबई आणि पुण्यात करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यासाठी या शहरातील ३० टक्के लोकसंख्या स्थलांतरित करण्याची गरज आहे. त्यासाठी किमान तीन दिवसांसाठी महाराष्ट्रापुरती रेल्वेसेवा सुरू करावी लागेल. भुसावळ, गोंदिया, नागपूर, नांदेड, लातूर, सोलापूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गपर्यंत रेल्वे वाहतूक सीमावर्ती भागापर्यंत चालवण्याची गरज आहे. यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपल्या गावी गेल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रवाशांना ताब्यात घेऊन क्वांरोनटाईन केल्यावरच त्यांना त्यांच्या मूळ गावी पाठवल्यास गावकऱ्यांमध्ये अशा लोकांप्रती भीती राहणार नाही. शिवाय ज्या लोकांकडे खासगी वाहने, बसेस आहेत या बसेसमधूनही अनेक लोकांना स्थलांतरित करण्यात यावे, ज्या ठिकाणी रेल्वे सुविधा नाही अशा ठिकाणी या बसेस पाठवून देणे गरजेचे आहे. असे नियोजन केल्यास दाट वस्ती असलेल्या शहरांमधील लोकसंख्या कमी करून करोनावर नियंत्रण मिळविता येईल. राज्य सरकारने असे नियोजन केले तर करोनावर मात करणं शक्य होईल, असंही आंबेडकर म्हणाले.

लॉकडाऊनला विरोध करण्यास आता सुरुवात झाली असून वांद्रे येथे जमलेली मजुरांची गर्दी हे त्याचे उदाहरण आहे. लॉकडाऊन वाढविल्याने हातावर पोट असणाऱ्या कामगारांना उपासमारीची वेळ येईल असे वाटू लागल्याने, त्यांनी आपला विरोध दर्शविला. शासनाकडे अन्नधान्याचा साठा असूनही त्याचे मोफत वाटप झाले नाही म्हणून त्याचा वांद्रे येथे उद्रेक झाला. शासनाने आता तरी जागं व्हावं. शासनाने योग्य ती पावलं उचलली नाही तर त्याचा उद्रेक देशभर होईल; असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांचा संयम सुटला. त्यांनी हजारोंच्या संख्येने वांद्रे टर्मिनस येथे गर्दी करून या लॉकडाऊनला विरोध केला. लॉकडाऊन वाढवल्याने आपल्यावर उपासमारीची वेळ येईल, अशी भीती या कामगारांना वाटली आणि त्यातूनच हा प्रकार घडला. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करून जमाव पांगविला, असं सांगतानाच शासनाकडे अन्नधान्याचा प्रचंड साठा असल्याने सरकारने हातावर पोट असलेल्यांना दोन महिन्याचे धान्य मोफत वाटावे, अशी आम्ही विनंती केली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्याने वांद्रे येथे मजुरांचा उद्रेक झाला, असा दावा आंबेडकरांनी केला आहे.

शासनाने कृती करण्याऐवजी २१ दिवसांमध्ये करोना कसा थांबवला याचंच गुणगान करण्यात सरकार मश्गुल आहे.परंतु ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांना काय सुविधा, मदत देणार, याबाबत प्रशासनाकडून काहीच अपेक्षित उत्तर देण्यात आलेलं नाही किंवा तसा खुलासाही झाला नाही. त्यामुळे वांद्रे सारखे उठाव आता महाराष्ट्रभर होतील आणि असे उठाव झाले तर देशभर उठाव व्हायला वेळ लागणार नसल्याचेही आंबेडकर म्हणाले. त्यामुळे जागे व्हा आणि कामाला लागा, असं आवाहनही त्यांनी सरकारला केलं आहे.'सीएम फंडातील योगदान CSR मध्ये ग्राह्य धरा'


दरम्यान, गुजरात राज्यातील सुरत या ठिकाणी कामगारांनी अशाच प्रकारे सरकार विरोधात आवाज उठवत रस्त्यावर आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनावरील नाराजी आता दिसून येऊ लागली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ आता गुजरातमध्येही लॉकडाऊनला विरोध करण्यास सुरुवात झाली आहे. असे उठाव देशभर होणार असल्याचे संकेत आंबेडकरानी दिल्यानंतर काही तासांतच सुरतमध्येही कामगारांनी आंदोलन केल्याचं समोर आलं आहे.
SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

0 comments: