प्रति,
मा. श्री डॉ. नितिन राउत साहेब,
ऊर्जामंत्री(महारास्ट्र राज्य)
पालकमंत्री(नागपुर जिल्हा)
नागपुर.
विषय-: तीन महिन्याचा बिजली बिल माफ करने हेतु निवेदन
माननीय महोदय,
कोविड-19 कोरोना प्रादुर्भाव मुळे संपूर्ण जग वैष्विक महामारिने त्रस्त आहे.त्यातच आपला नागपुर शहर सुद्धा कोरोना प्रादुर्भाव मुळे आम जनता त्रासलेले आहे.केंद्र सरकारचा आदेशाने 20 मार्च पासून लॉक डाउनला सुरुवात जनता कर्फ्यू पासून झाली. त्यातच सतत नागपुर शहर लॉक डाउन सातत्याने 3 महीने जवळपास बंद झाले. या कोरोना लॉक डाउन मुळे सम्पूर्ण नागपुर शहर एकाच जागेवर शांत झाले.
कोरोना लॉक डाउन मुळे नागपुर शहरात व्यापार चौपट झाला. लोकांचा देवान-घेवान आर्थिक स्थिति नेस्तनाबूत झाली. सर्वांचे आर्थिक व्यवहार बंद पडले. नागपुर शहरातील गरीब जनतेचे हाल-बेहाल झाले. मिडल क्लास जनता त्रस्त झाली. दुकानात काम करणारे गरीब जनतेवर उपासमारिची पाड़ी आली. नागपुर शाहरामधे किमान 60% लोक झोटया. मोठ्या कंपन्या तसेच दुकानात काम करुण जीवन बसर करीत होते. केंद्र सरकारचा आदेशानुसार संपूर्ण नागपुर ची जनता सतत तीन महीने घरी बसून राहिले. त्यामुळे नागपुर शहराच्या जनतेवर उपासमारीची पाड़ी आली. या 3 महिन्यात आर्थिक व्यवहार नसल्यामुळे संपूर्ण व्यापार बंद झाला. त्यामुळे कंपन्या ते दुकानात काम करणाऱ्या मुलांना कामावरुन काढण्यात आले. त्यामुळे बेरोजगारिचे प्रमाण वाढले.
अश्या परिश्थिति मधे महारास्ट्र इलेक्ट्रिक बोर्डची मनमानी वाढू लागली या लॉक डाउन मुळे एप्रिल, में, जून या तीन महिन्याचा रीडिंग न घेता मनमानी अंदाजे बिल उपभोक्ताना पाठविले आहे ज्या लोकांना 1महिन्याचा बिल 500 रुपये यायचा त्या ठिकाणी त्यांना 2000 हजार रुपये बिल आला आहे.हा सरासर गरीब जनतेवर महारास्ट्र इलेक्ट्रिक बोर्ड अन्याय करीत आहे.एक्स्ट्रा चार्जेस म्हणून GST टैक्स, भर आकारणी ते विविध प्रकारचे चार्जेस लाउंन आम जनतेची फसवणूक केली जात आहे. याकडे राज्यसरकार ने लक्ष्य दिले पाहिजे.
मा. नितिन राउत साहेब आपन ऊर्जामंत्री तसेच नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, नागपुर शाहरामधे मोठ्या प्रमाणात स्लम बस्ती आहेत. तसेच ज्या ठिकाणी कन्टेन्टमेंट रेड झोन आहेत त्या ठिकाणी उपासमारी जास्त प्रमाणात वाढली आहे. आपन बिजली बिल एप्रिल, में, जून या तीन महिन्याचा माफ न केल्यास कंटेन्मेंट रेड झोन मधल्या राहणाऱ्या लोकांवर मानसिक परिणाम व आर्थिक तनावामुळे आत्महतेचा प्रयत्नं करतील याचा जिम्मेदार कौन?
या तीन महिन्यापासून लोकांकडे काम नसल्यामुळे समोर किती दिवस कोविड-19 चा प्रकोप चालणार याचा काहीही अंदाज़ नाही. मि मोतीराम मोहाडिकर मध्य नागपुर काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष तसेच काँग्रेस पक्ष्याचा जिम्मेदार पदाधिकारी या नात्याने गरीब जनतेवर या इलेक्ट्रिक बिजली बिल चा भार न पड़ता आपणास नम्र विनंती आहे की आपन एप्रिल, में,जून या तीन महिन्याचा इलेक्ट्रिक बिजली बिल माफ करावे ही आग्रहाची विनंती. या निवेदन सोबत गीता जलगांवकर, रमेश वाघ, चेतन निखारे, धीरज निखारे सोबत होते.
आपला सेवक
मोतीराम मोहाडिकर
अध्यक्ष
मध्य नागपुर काँग्रेस ब्लॉक-16
0 comments: