संजय पाटील : नागपूर 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी मंगळवार, १४ एप्रिलला बौद्ध-आंबेडकरी अनुयायींनी घरीच राहावे. घरीच बुद्धवंदना घ्यावी, घरावर पंचशील ध्वज लावावेत. बाबासाहेबांची निवडक भाषणे ऐकावीत, २२ प्रतिज्ञांचे वाचन करावे,' असे आवाहन दीक्षाभूमी स्मारक समितीसह विविध संघटनांनी केले आहे. दीक्षाभूमी, संविधान चौक आणि कुठल्याही बुद्धविहारात गर्दी करू नये, करोना विषाणूच्या संसर्गापासून नागपूरकर व शहरास वाचविण्यासाठी असलेल्या जबाबदारीचे पालन व्हावे, असे आवाहन असे आवाहनही दीक्षाभूमीवरून करण्यात आले आहे.
जबाबदार नागरिक म्हणून आपण आपल्या घरीच राहून करोनाविरुद्धच्या या लढाईत मोलाचे योगदान देऊ शकतो. सार्वजनिक ठिकाणी गर्दी झाल्यास करोना विषाणू मोठ्या प्रमाणावर पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे एक जबाबदार बौद्ध- आंबेडकरी नागरिक म्हणून आपलीही जबाबदारी आहे. यावेळची आंबेडकर जयंती आपण आपल्या घरीच राहून साजरी करा, असे आवाहन परमपूज्य. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीतर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.
येत्या १४ तारखेला सर्व नागरिकांनी आपापल्या घरांवर पंचशील ध्वज लावावे. घरांसमोर मेणबत्ती प्रज्वलीत करावी तसेच मंगळवारी १४ तारखेला सकाळी ९ वाजता सर्वांनी आपापल्या घरीच कुटुंबासह बुद्धवंदना घ्यावी, २२ प्रतिज्ञांचे उच्चारण करावे आणि बाबासाहेबांची जयंती साजरी करावी. परंतु कुठल्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये. दीक्षाभूमी परिसर पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. तेव्हा दीक्षाभूमी किंवा संविधान चौक तसेच आपापल्या परिसरातील बुद्ध विहार आणि सार्वजनिक ठिकाणी जयंतीचे कुठलेही कार्यक्रम घेऊ नका, गर्दी करू नका, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, सदस्य विलास गजघाटे, एन. आर. सुटे, सुधीर फुलझेले, आनंद फुलझेले आदींनी केले आहे
जबाबदार भारतीयत्वाची भूमिका वठवा!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या सर्व बुद्धिवादी, अनुयायांनी देशाच्या या संकटसमयी जबाबदार भारतीयत्वाची भूमिका वठवावी, असे आवाहन विविध संघटनांनी केले आहे. यंदा घरीच डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या अमूल्य अशा वैचारिक ठेवांचे वाचन कुटुंबांसोबत करण्याची संधी आहे. या संधीचा लाभ घ्यावा. घरीच बुद्धवंदना, त्रिशरण पंचशील आणि घरावर पंचशील ध्वजासह तथागत गौतम बुद्ध व डॉ. आंबेडकर यांच्या फोटोसमोर एक मेणबत्ती प्रज्वलीत करावीच, असे आवाहनही केले आहे. पीरिपाचे अध्यक्ष व आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, आमदार प्रकाश गजभिये, पीरिपाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, माजी राज्यमंत्री अॅड. सुलेखा कुंभारे, सामाजिक आर्थिक समता संघाचे प्रा. डॉ. सुखदेव थोरात, डॉ. त्रिलोक हजारे, डॉ. विमल थोरात, डॉ. कृष्णा कांबळे, प्रा. गौतम कांबळे, डॉ. अशोक उरकुडे, छाया खोब्रागडे, गौतम शेगावकर, डॉ. परीश भगत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समारोह समितीचे प्रा. प्रदीप आगलावे, डॉ अनिल हिरेखन, पी. एस. खोब्रागडे, डॉ. चंद्रशेखर गायकवाड, राजेश लोखंडे, प्रदीप नगराळे, अमन कांबळे, डॉ. बी. एस. गेडाम, प्रा. सरोज आगलावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टिचर्स असोसिनशनचे डॉ. जयंत जांभुळकर, रिपाइं (गवई)चे प्रकाश कुंभे, रिपाइं(आठवले) प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, शहराध्यक्ष बाळू घरडे, राजन वाघमारे, पाली प्राध्यापक परिषदेचे प्रा. बालचंद्र खांडेकर, प्रा. नीरज बोधी, प्रा. डॉ. मालती साखरे, रिपब्लिकन मुव्हमेंटचे नरेश वाहाणे, मुक्तीवाहिनीचे प्रा. ताराचंद्र खांडेकर, इ. मो. नारनवरे, प्रसेनजीत ताकसांडे, बुद्ध विहार मैत्री संघ नागपूर व वंदना संघ दीक्षाभूमी समन्वय समितीचे धम्मदीप डोंगरे, धर्मेश फुसाटे, वासुदेव थुल, गणेश पाटील, पी. बी. चंद्रकापुरे, वैद्य, रेमण लोखंडे ,कानफाडे, विनोद चहांदे, रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे, रिपब्लिकन (सेक्युलर)चे विदर्भ अध्यक्ष दिनेश अंडरसहारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मीडिया फोरमतर्फे नरेश मेश्राम, रावसाहेब मोहोड, प्रभाकर दुपारे यांच्यासह शेकडो संघटनांनी समस्त आंबेडकरी जनतेला घरूनच यंदाची जयंती साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
14 एप्रिलच्या आदल्या दिवशी कोणालाही आपली घरे सोडू नये. यापुढे मिरवणूक, संगीत वा इतर कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जाऊ नये, असे आवाहन पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले. 14 एप्रिल ही भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. डॉ. राऊत म्हणाले, "डॉ. आंबेडकरांनी आपल्या लोकांना स्वाभिमान, सन्मान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लढा देण्याचे धैर्य दिले. हा कार्यक्रम भव्य मिरवणूक काढून, विहारात जमवून, सामाजिक, सांस्कृतिक आणि संगीत कार्यक्रम इत्यादीद्वारे साजरा केला जातो परंतु यावर्षी असे करू नका.
डॉ. आंबेडकर यांनी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्या लोकांना स्वाभिमान, सन्मान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लढा देण्याचे धैर्य दिले. ” डॉ. राऊत यांनी सांगितले की, “बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना तयार करण्यात मोलाची भूमिका बजावली आणि‘ भारतीय राज्यघटनेचे जनक ’ही भूमिका मिळवली. आंबेडकर जयंती हा देशभरात भारतीयांनी साजरा केला आहे आणि आता तो भारतातील सर्वात मोठा उत्सव बनला आहे. परंतु यावर्षी हा उत्सव अगदी वेगळ्या आणि योग्य पद्धतीने साजरा करावा लागेल.
म्हणून मी तुम्हा सर्वांना खालील पद्धतीने साजरा करण्याची विनंती करतो. 14 एप्रिलच्या आदल्या दिवशी कोणालाही आपली घरे सोडू नये. पुढे मिरवणूक, डीजे किंवा इतर कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जाऊ नयेत. ” “या दिवशी सकाळी लवकर उठा. आंघोळ केल्यावर स्वच्छ पांढरे कपडे घाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुध यांच्या वंदनाचे आयोजन. प्रत्येक घरात त्रिशरण पंचशील व गाथाचे पठण होऊ शकते. सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून, आपल्या क्षमतेनुसार आणि आपल्या इच्छेनुसार आपल्या शेजारच्या कमीतकमी 5 लोकांना खायला देण्याचा प्रयत्न करा आणि आम्हाला खात्री करुन द्या की एकाही व्यक्ती रिकाम्या पोटी झोपू नये. धनंजय कीर किंवा सी बी खैरमोडे यांचे डॉ. आंबेडकर यांचे चरित्र वाचा.
या आजाराचा पराभव करण्यासाठी आपण सर्वांनी सामाजिक अंतर पाळले पाहिजे, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे आणि साबणाने वारंवार हात स्वच्छ केले पाहिजेत. पुढे मुखवटे वापरा आणि स्वत: ला आणि आपल्या कुटुंबास या व्हायरसपासून वाचवण्यासाठी सरकारच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा. हा दिवस ‘जागतिक ज्ञान दिन’ म्हणून साजरा करण्याचे आपण सर्वांनी वचन दिले आहे, असेही डॉ राऊत म्हणाले.