Wednesday, 19 February 2020

'जलयुक्त शिवार' बट्ट्याबोड - फडणवीसांची डोकेडुखी- संजय पाटील

'जलयुक्त शिवार' बट्ट्याबोड - फडणवीसांची डोकेडुखी- संजय पाटील

Image result for jalyukt shivar abhiyan

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेली 'जलयुक्त शिवार' ही योजनाही बंद करण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारने केली आहे. योजनेच्या अंमलबजावणीतील अशास्त्रीय पद्धत, अनियमितता आदी कारणांमुळे सुमारे साडेआठ हजार कोटी रुपयांच्या या योजनेचा राज्याला फारसा फायदा झाला नसल्याच्या निष्कर्षाप्रत नवे सरकार आल्याचे कळते.



संजय पाटील : मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेली 'जलयुक्त शिवार' ही योजनाही बंद करण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारने केली आहे. योजनेच्या अंमलबजावणीतील अशास्त्रीय पद्धत, अनियमितता आदी कारणांमुळे सुमारे साडेआठ हजार कोटी रुपयांच्या या योजनेचा राज्याला फारसा फायदा झाला नसल्याच्या निष्कर्षाप्रत नवे सरकार आल्याचे कळते. त्यामुळेच ३१ डिसेंबर २०१९ नंतर या योजनेच्या राज्यातील एकाही कामाला मंजुरी देण्यात आली नसून, या योजनेऐवजी पाणलोट क्षेत्र विकासासाठी नवी योजना हे सरकार आणणार आहे.
:
अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती, सिंचनाच्या मर्यादित सुविधा यामुळे काही वर्षांत कृषी क्षेत्रात अनिश्चितता वाढली आहे. त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने कोट्यवधी रुपयांच्या सिंचनाच्या योजना हाती घेऊनही सिंचनाचा टक्का वाढला नसल्याचे मत मांडत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी 'जलयुक्त शिवार अभियान' राबविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ही योजना राबवताना तांत्रिक बाबी लक्षात घेण्यात आल्या नसल्याचे महाविकास आघाडी सरकारला अभ्यासानंतर आढळून आले आहे.

यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत विविध बारा योजना शास्त्रशुद्ध पद्धतीने सुरू असताना सन २०१४मध्ये सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हा कार्यक्रम बंद केला. त्यातील १२ योजनांचे एकत्रीकरण करून त्यातूनच जलयुक्त शिवार ही नवी योजना सुरू केली. मात्र, ही योजना राबवताना तांत्रिक बाबी लक्षात घेण्यात आल्या नसल्याचे आणि या योजनेचा लाभ झालाच नसल्याचे महाविकास आघाडी सरकारला अभ्यासानंतर आढळून आले आहे.

Tuesday, 18 February 2020

शिक्षणामुळेच प्रगतीचा मार्ग प्रशस्त होतो - राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट: संजय पाटील

शिक्षणामुळेच प्रगतीचा मार्ग प्रशस्त होतो - राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट: संजय पाटील

स्व.मनोहरभाई पटेल जयंतीनिमीत्त सुवर्ण पदक वितरण समारंभ

संजय पाटील : गोंदिया : जिल्ह्याच्या विकासासाठी एका विशिष्ट दृष्टीकोनातून इथल्या विमानतळाचा विकास, वैमानिक प्रशिक्षण संस्था आणि वेगवेगळ्या शिक्षणाच्या सुविधेसाठी संस्थांची निर्मिती मनोहरभाई पटेल आणि प्रफुल पटेल यांनी केली आहे. गोंदिया शिक्षण संस्था ही गुणवत्तेला महत्त्व देऊन दोन्ही जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहे. शिक्षणातूनच प्रगतीचा मार्ग प्रशस्त होतो. असे प्रतिपादन राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केले.

गोंदिया येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात स्व.मनोहरभाई पटेल यांच्या ११४ व्या जयंती निमित्ताने गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सुवर्ण पदक वितरण समारंभाचे उद्घाटक म्हणून श्री. पायलट बोलत होते. अध्यक्षस्थानी खा.प्रफुल पटेल हे होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, गृहमंत्री तथा पालकमंत्री अनिल देशमुख, पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, चित्रपट अभिनेता सुनील शेट्टी यांची उपस्थिती होती.
श्री. पायलट म्हणाले, शिक्षणासाठी जो राज्याचा पैसा खर्च होतो तो खर्च नसून गुंतवणूक आहे. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात जे शिक्षण देण्यात येते, त्या शिक्षणातून विविध क्षेत्राच्या विकासाला गती मिळते. गुणवंत विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने परिश्रम, जिद्दीने यश संपादन केले आहे त्यांची प्रेरणा इतर विद्यार्थ्यांनी घेऊन शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. वंचित, शोषित, शेतकरी व शेतमजूरांच्या मुलांनी जिद्दीने शिक्षण घेवून आयएएस, आयपीएस सारखी मोठी पदे भूषवावीत. त्यामुळे आपण ज्या समाजातून आलेलो आहोत याची जाणीव ठेऊन त्या समाजाच्या विकासाला गती मिळण्यास याचा हातभार लागेल असे त्यांनी सांगितले.
श्री. पटेल म्हणाले, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दरवर्षी करण्यात येतो. या विद्यार्थ्यांची प्रेरणा घेऊन इतर विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आपला नावलौकिक करावा हा उद्देश आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात १९५६ मध्ये कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक सुविधा नसताना मनोहरभाई पटेलांनी गोंदिया शिक्षण संस्थेची स्थापना करुन शिक्षणाची ज्योत प्रज्वलित केली. सर्वप्रथम त्यांनी शिक्षणाकडे लक्ष दिले. त्यांनी लावलेल्या शैक्षणिक रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. गोंदिया व भंडारा जिल्ह्यात या शिक्षण संस्थेत जवळपास १ लाख २५ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी विविध शाखेत शिक्षण घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षणासोबतच मनोहरभाईंनी सिंचनाकडेही लक्ष दिल्याचे सांगून खा.पटेल म्हणाले, अनेक सिंचन प्रकल्पाची सुरुवात त्यांच्या काळात झाली. दोन्ही जिल्ह्यात अनेक विकास कामे झाली. केवळ एवढ्याच विकासावर न थांबता आणखी विकास करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींवर विकासाची जबाबदारी आहे. ४७० कोटी रुपये निधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीसाठी मंजूर असून नियोजित जागेवर येत्या दोन वर्षात ही इमारत पुर्ण होईल असा विश्वास व्यक्त करुन श्री. पटेल यांनी धापेवाडा टप्पा-२ आणि टप्पा-३ चे काम देखील दोन वर्षात पूर्ण करावयाचे असून गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील शेतीला मोठ्या प्रमाणात सिंचनाची सुविधा निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. पटोले म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाला दिशा देण्याचे काम मनोहरभाई पटेलांनी केले. प्रफुल पटेल यांच्या पुढाकारातून दोन्ही जिल्ह्यात वन कायद्यात अडकलेले अनेक सिंचन प्रकल्प सोडविण्यात आले आहे. त्यामुळे हे सिंचन प्रकल्प पुर्ण होण्यास मदत होणार आहे. धापेवाडा टप्पा-२ आणि धापेवाडा टप्पा-३ पुर्ण होताच दोन्ही जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात समृद्धीचा मार्ग प्रशस्त होण्यास मदत होणार आहे. मार्चअखेर गोंदिया-जबलपूर रेल्वे लाईनचे काम पुर्ण होणार असल्यामुळे दक्षिण ते उत्तर रेल्वे लाईनचे अंतर कमी होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यापाराला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
शिक्षण क्षेत्रात आणखी काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून श्री. पटोले म्हणाले, आज बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. बेरोजगारांना तांत्रिक आणि कौशल्याचे शिक्षण दिले तर त्यांना स्वावलंबनास मदत होणार आहे. विधानसभा अध्यक्ष या नात्याने राज्यातील जनतेला न्याय देण्याचे काम करण्यात येईल असे सांगितले. गोंदिया व भंडारा जिल्ह्यात पोलिसांच्या विविध ठिकाणी असलेल्या शासकीय निवासस्थानांची दुरावस्था झाली आहे. यासाठी गृह विभागाने चांगले क्वार्टर्स बांधण्याचे काम हाती घ्यावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
श्री. देशमुख म्हणाले, मनोहरभाई पटेलांनी त्या काळात दोन्ही जिल्ह्यात शिक्षणाची व्यवस्था निर्माण केली. शेतकऱ्यांसाठी सिंचन प्रकल्पाची सुरुवात केली. दोन्ही जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे यादृष्टीने काम केले. राज्यात ८ हजार पोलिसांची भरती करण्यात येईल. वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीसह धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे काम येत्या दोन ते तीन वर्षात पुर्ण करण्यात येईल. अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येतील. शासनाने २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले असून लवकरच २ लाख रुपयांवरील कर्ज माफ करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असे ते म्हणाले.
श्री. ठाकरे म्हणाले, गोंदिया शिक्षण संस्थेचा परिसर बघून असे वाटत आहे की, आपण एखाद्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कॉलेजच्या परिसरात आलो आहे. विद्यार्थ्यांनी आणि संस्थेनी चांगली जपवणूक केली आहे. इथे शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. चांगली मेहनत व परिश्रमातून विद्यार्थ्यांनी हे यश गाठले आहे. मनोहरभाई पटेल यांचा वारसा प्रफुल पटेलांनी यशस्वीपणे पुढे चालविला आहे. दोन्ही जिल्ह्यात शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण गावागावापर्यंत घेऊन जाण्याचे काम त्यांनी केले. शिक्षण हे महाराष्ट्रासाठी गरुड झेप आहे. देशाला सुपरपॉवर बनवायचे असेल तर शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
अभिनेता सुनिल शेट्टी यांनी भाषणाची सुरुवात मराठीत केल्याने उपस्थित युवावर्गाने टाळ्यांचा कडकडाट करुन प्रतिसाद दिला. चांगल्या समारंभाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभल्याचे सांगून श्री. शेट्टी म्हणाले, गोंदिया शिक्षण संस्था उत्तम प्रकारे काम करत आहे. शिक्षण हे जीवन आहे. तुमच्याकडे असलेली बुद्धी कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मी अभिनेता आहे नेता नाही त्यामुळे मला भाषण देता येत नाही असे सांगितले. चित्रपटातील ‘मै तुम्हे भूल जाऊ यह हो नही सकता और तुम मुझे भूल जाओ ये मै होने नही दुंगा’ हा संवाद ऐकवून उपस्थितांच्या प्रचंड टाळ्या घेतल्या. भविष्यात वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनाला नक्कीच येईल असे ते म्हणाले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील आदित्य राहुलकर, कल्याणी सोनवाणे, सिया ठाकुर, अर्चना राऊत, अक्षय शिवणकर, मेघा अग्रवाल, सोनिया नंदेश्वर, प्रतिक्षा वेदपुरीया, खुशी गंगवाणी, सुषुप्ती काळबांडे, पायल चोपडे, समिक्षा बोरघरे व मनिषा भदाडे यांचा सुवर्ण पदक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी स्वागतगीत मनोहरभाई पटेल सैनिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केले.
धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय परिसरात असलेल्या गोंदिया शिक्षण संस्थेत मान्यवरांचे आगमन होताच राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी कृषी प्रदर्शनाचे उदघाटन केले. बिरसी विमानतळ येथून पाहुण्यांचे सर्वप्रथम मनोहरभाई पटेल इंजिनियरींग महाविद्यालयाच्या परिसरात आगमन झाले. यावेळी पाहुण्यांनी मनोहरभाई पटेल यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्प अर्पण केले. बिरसी विमानतळ येथे मान्यवरांचे आगमन होताच त्यांनी बिरसी विमानतळ येथे असलेल्या वैमानिक प्रशिक्षण संस्थेला भेट दिली.
कार्यक्रमाला मंचावर गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष वर्षा पटेल, भंडारा जि.प. अध्यक्ष रमेश डोंगरे, आमदार सर्वश्री विनोद अग्रवाल, गोंदिया नगराध्यक्ष अशोक इंगळे, भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी यांच्यासह विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, युवक-युवती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन माजी आ.राजेंद्र जैन आणि जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार माजी आ.राजेंद्र जैन यांनी मानले.

शासकीय धोरणानुसार निधीचा उपयोग करा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले : संजय पाटील

शासकीय धोरणानुसार निधीचा उपयोग करा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले : संजय पाटील

साकोली येथे विविध विकास कामांचा आढावा

संजय पाटील:  भंडारा : शासकीय योजनांचे प्रारूप व उद्देश साधून सर्वसामान्य नागरिकांना योजनेचा लाभ मिळेल याकरिता नियोजन बद्ध व कालबद्ध पद्धतीने कार्य करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी उपविभागीय आढावा बैठकीत दिले.

साकोली उपविभागीय क्षेत्रातील आढावा बैठकीत साकोली येथील पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठी ४९६.३० लक्ष निधी मंजूर झाला असून दोन हेक्टर जागेत पंचायत समितीची नवीन इमारत दहा हजार सातशे एकवीस चौरस फूट मध्ये बांधकामाचे टेंडर झाले असून लवकरच त्याचे वर्क ऑर्डर काढण्याचे निर्देश श्री. पटोले यांनी दिले. त्याचप्रमाणे लाखांदूर येथील पंचायत समितीच्या नवीन इमारती करता ९ कोटी ३० लक्ष रुपयांचे प्रस्ताव पाठविण्यात आली असून ते सुद्धा लवकरच मंजूर करण्यात येतील व जुन्या ठिकाणी पंचायत समितीची नवीन इमारत तयार करण्यात येणार असल्याचे श्री. पटोले यांनी सांगितले. उपविभागीय क्षेत्रातील तालुका क्रीडा संकुलाच्या देखरेखीसाठी स्थानिक स्तरावर समिती तयार करावी. क्रीडा संकुल सुशोभित व सर्व सोयींनी युक्त करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना श्री. पटोले यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीप चंद्रन उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे, उपविभागीय अधिकारी भंडारा श्रीकृष्ण पांचाळ तहसीलदार मल्लिक विरानी, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत शिंदे, तालुका क्रीडा अधिकारी प्रशांत गोंदल, डीसीसी बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते, लाखनी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष ज्योती निखाडे उपस्थित होते. गोसेखुर्द डाव्या कालव्याचे व नेरला उपसा सिंचन योजना तसेच निम्न चुलबंद प्रकल्पाचे काम हे अंतिम टप्प्यात असून उर्वरित भूसंपादनाच्या अडचणी दूर करून प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मोबदला तातडीने द्यावा अशा सूचना करुन सिंचन प्रकल्पाचे कार्य युद्धस्तरावर पूर्ण करून पुढील वर्षी शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी देण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष यांनी याप्रसंगी दिली.
या आढावा बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सर्व प्रकारच्या आवास योजना प्रलंबित भूसंपादन प्रकरणे विविध कृषी योजनांच्या आढावा पाणीटंचाई सिंचन प्रकल्पाची सद्यस्थिती वनहक्क अतिक्रमणाबाबत मुद्दे शेतकरी कर्ज मुक्ती योजना व उपविभागातील तालुका क्रीडा संकुला विषयी आढावा अशा विविध विषयांच्या आढावा बैठकीत घेण्यात आला.
प्रधानमंत्री आवास योजना प्रभावीपणे राबवा केंद्र शासन निधी उपलब्ध करून देत नसल्याने राज्य सरकार ही जबाबदारी उचलण्यासाठी सक्षम असून अपूर्ण घरकुलांसाठी राज्य सरकारची निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची माहिती अध्यक्षांनी दिली. कृषी विभागाने क्रियाशील शेतकऱ्यांपर्यंत जाऊन नाविन्यपूर्ण योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा याकरिता प्रयत्न करावे. शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत असून त्याला चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.



Sunday, 16 February 2020

‘Irrigation sector backlog in Vidarbha’s 4 dist. require Rs 15,488 cr for removal’: Sanjay Patil

‘Irrigation sector backlog in Vidarbha’s 4 dist. require Rs 15,488 cr for removal’: Sanjay Patil

Irrigation sector backlog

Sanjay Patil :Nagpur:Though Vidarbha region’s financial backlog came to an end some years ago, the physical backlog of four districts in Amravati division is yet to be over. This backlog exists in irrigation sector. Currently, the backlog is pegged at 1,63,139 hectares and it will require Rs 15,488.04 crore for removal, said Chainsukh Sancheti, Chairman of Vidarbha Development Board (VDB). Addressing a press conference at VDB on Thursday, after the board meeting, Sancheti said that the backlog removal programme for the four districts of Amravati division was prepared in the year 2012 as per the Maharashtra Governor’s directions. These four districts include Amravati, Akola, Washim, and Buldhana.
The programme included 102 irrigation projects. Of these, 54 have been completed. Of these 54 projects also, 40 have been completed after June 2014. At present, work of 27 other projects is partially over. At the end of June 2019, total irrigation potential (Rabi equivalent) created was 15,624 hectares and water storage of 73.99 million cubic metres was built in the completed projects, he said.
According to Sancheti, during June 2012 and June 2019, 70,880 hectares of backlog in irrigation sector in case of these four disricts was removed. Of this, backlog of 60,819 hectares was removed after June 2014. At present, he told mediapersons, the balance physical backlog is 1,63,139 hectares. As per the initial estimated, the removal of the said backlog required Rs 10,585 crore. Now, he added, the estimated requirement of funds for backlog removal is Rs 15,488.04 crore. In 2019-20, an allocation of Rs 1,894 crore was proposed along with supplementary provision for the four backlog districts of Amravati division. Clubbed with unspent amount of Rs 301.13 crore in 2018-19, the total funds available for the backlog districts in 2019-20 was pegged at Rs 2,195.05 crore.
Till December 2019, an amount of Rs 775.80 crore has been spent, Sancheti said in reply to a question. The backlog of the four districts will be removed by the year 2022-23. To ensure completion of the irrigation projects, VDB is making efforts to raise funds through Centrally-sponsored schemes namely Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana (PMKSY) and Baliraja Jal Sanjeevani Yojana (BJSY). Under PMKSY, 75 per cent funding comes from NABARD and 25 from the Centre. “Usually, NABARD reimburses expenses incurred on projects. Now, VDB will be requesting the Governor to ask NABARD to give funds straight to Vidarbha Irrigation Development Corporation to expedite completion of projects,” said Sancheti. Replying to a question, the VDB Chairman said that VDB would get extension. VDB’s previous extension is coming to an end in April 2020. “VDB has been there, and will be there,” he said. Hemant Kumar, Member Secretary of VDB; Dr Kishor Moghe, Expert Member; Prakash Dayare, Joint Director and other officials were present on the occasion. Sancheti asks district officials to utilise special funds by Mar 31 Chainsukh Sancheti, Chairman of VDB, presided over a meeting of the board on Thursday. After taking stock of the situation, he asked the officials at district level to ensure that special fund was utilised by March 31 this year. VDB got a special fund of Rs 50 crore in July 2019. The fund is supposed to be utilised in the area that has 60 tehsils and 18 Class ‘C’ municipal councils in Vidarbha. The fund is to be utilised on raising human development index (HDI), particularly with initiatives relating to education, health, and livelihood/employment opportunities. In the first phase, proposals worth Rs 46.5 crore were cleared, and in the second phase proposals worth Rs 3.50 crore were given nod. Sancheti told mediapersons that VDB received proposals from the District Collectors and then approved the same. These approved proposals were sent to the Divisional Commissioners concerned (Nagpur and Amravati), who then forwarded the same to Human Development Commissioner. After nod of Human Development Commissioner, now the process of technical sanction, administrative sanction, and tendering is on in respective districts. “We have asked the respective district administration to ensure that the special fund is utilised by March 31,” he said. Asked if it was possible to utilise the fund by March-end if the tender process started in February, Sancheti said that VDB had called the meeting of District Planning Officers precisely to guide them in this regard. The only issue is in Yavatmal district where Model Code of Conduct was in force for State Legislative Council elections. Hence, he added, VDB has urged the Governor to direct the State Government to allow VDB to utilise the fund in the next financial year in case of Yavatmal district. Dr Sanjeev Kumar, Divisional Commissioner, Nagpur; Hemant Kumar, Member Secretary of VDB; Dr Kishor Moghe, Expert Member; Prakash Dayare, Joint Director and others attended the meeting.
ॲम्फी थिएटरच्या कामाला गती द्या - सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे : संजय पाटील

ॲम्फी थिएटरच्या कामाला गती द्या - सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे : संजय पाटील




संजय पाटील: नागपूर : वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षानिमित्त मौजा पांढराबोडी येथील विद्यापीठाच्या जागेवर प्रस्तावित ॲम्फी थिएटरच्या बांधकामाला गती द्या, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी येथे काल (ता. 13) दिले.

छत्रपती सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी श्री. भरणे यांनी ॲम्फी थिएटरच्या बांधकामाबाबत चर्चा केली. नागपूर विभागात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरु आहेत. याच धर्तीवर नागपूर शहरात विस्तीर्ण स्वरुपाचे सभागृह नसल्यामुळे ॲम्फी थिएटर सारख्या सभागृहाची निकड लक्षात घेवून दोन हजार आसनक्षमतेचे सभागृह बांधण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्ष योजनेंतर्गत मौजा पांढराबोडी येथील विद्यापीठाच्या जागेवर प्रस्‍तावित ॲम्फी थिएटरच्या बांधकामाला गती देण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. या सभागृहासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून जिल्हाधिकारी, नागपूर मार्फत २० कोटींचा निधी उपलब्ध करुन दिलेला आहे.

ॲम्फी थिएटरच्या बांधकामासाठी १४४ कोटी ३४ लाख रुपयांची गरज लक्षात घेता सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यासाठीचा प्रस्ताव १२ मार्च २०१९ रोजी शासनाला सादर करण्यात आला आहे. याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Thursday, 13 February 2020

"दर्जेदार व शाश्वत कामे करा" - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे- संजय पाटील

"दर्जेदार व शाश्वत कामे करा" - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे- संजय पाटील



सार्वजनिक बांधकाम विभागाचा घेतला आढावा

संजय पाटील : नागपूर :
 विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कामे सुरु आहेत. ही कामे आधुनिक तंत्राचा वापर करुन दर्जेदार व श्वाश्वत स्वरुपात करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज आढावा बैठकीत केली.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार सहायक मुख्य अभियंता एम. एस. बांधवकर, विशेष प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे, अधीक्षक अभियंता व्ही. डी. सरदेशमुख यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्य अभियंता श्री. देबडवार यांनी विभागाचे संगणकीय सादरीकरण केले. रस्ते, इमारतीच्या बांधकामाची बरीच कामे राज्यभरात सुरु आहेत. नागपूर विभागातील कामांची संख्याही मोठी आहे. कनिष्ठ अभियंत्याच्या भरतीमुळे कामांना गती आली असल्याची माहिती यावेळी मुख्य अभियंत्यांनी दिली. रस्ते विकास योजनेंतर्गत ३१ मार्च २०१९ पर्यंत ८९.५५ टक्के काम झाले असून याबाबत श्री. भरणे यांनी समाधान व्यक्त केले.

विभागाच्या अखत्यारितील नागपूर विभागीय प्रयोगशाळेला नॅशनल अक्रीडेशन बोर्ड फॉर टेस्टींग ॲण्ड कॅलीबरेशन लेबॉरेट्रीज (एनएबीएल) चे प्रमाणपत्र मिळाल्याने विभागातील दक्षता व गुणनियंत्रण पथकाच्या कामासाठी डॉ. नितीन टोणगावकर यांचा सत्कार श्री. भरणे यांनी यावेळी केला. चंद्रपुरातही प्रयोगशाळा सुरु असल्याची माहिती देण्यात आली.

वर्धा येथील सेवाग्राम विकास आराखडा व सैनिकी स्कूल चंद्रपूरच्या कामांची सद्य:स्थिती श्री.भरणे यांनी घेतली. विभागातील एकूण ६२ विश्राम गृहाकरिता सोलर रुफटॉप करण्याचे नियोजित असून या माध्यमातून ऊर्जा बचत व ऊर्जा संवर्धनाचा चांगला प्रयत्न होत असल्याने या कामाला गती देण्याचे निर्देश श्री. भरणे यांनी दिले.


Review of Public Works Department

Sanjay Patil : Nagpur: A large number of works are underway through the Public Works Department of the department. Minister of State for Public Works Dattatreya Bharne today directed to review these works in a quality and sustainable manner using modern technology.

Chief Engineer of Public Works Department Ulhas Debadwar Assistant Chief Engineer M. S. Bandhavkar, Executive Engineer of Special Project Satish Ambore, Superintending Engineer V. D. Sardarmukh including senior officers of the department were present on the occasion.

Chief Engineer Shri. Debdwar made computer presentation of the department. A lot of work on the construction of roads, buildings is underway across the state. The number of works in Nagpur division is also large. The Chief Engineer informed that the recruitment of the Junior Engineer has accelerated the work. Under the Road Development Scheme, as on March 31, 2019 , 89.55  percent work was done. Bharne expressed satisfaction.

The Nagpur Divisional Laboratory, under the aegis of the Department, received the certification of National Accreditation Board for Testing and Calibration Laboratories (NABL) by Dr. Nitin Tongaonkar was honored by Sh. Bharaya did this time. It was also informed that a laboratory was started in Chandrapur.


Mr. Bharane took up the current status of Sevagram Development Plan and Military School Chandrapur at Wardha. Solar rooftop is planned for a total of 62 rest houses in the department and through this efforts are being made to conserve energy and conserve energy. 

Saturday, 8 February 2020

"धमक्यांना न घाबरता लिखाण करा"-साहित्यिक अरुणा सबाने - संजय पाटील

"धमक्यांना न घाबरता लिखाण करा"-साहित्यिक अरुणा सबाने - संजय पाटील

Image result for aruna sabane

संजय पाटील:नागपूर 'लिखाणाच्या प्रांतात वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. भिन्नभिन्न विषय आणि साहित्य प्रकार हाताळल्याने लिखाण समृद्ध होत असते. पण, हल्ली धडाडीच्या आणि वास्तववादी लिखाणावरून धमक्या येण्यास सुरुवात झाली आहे. या धमक्यांना न घाबरता लिखाण करायला हवे. कितीही धमक्या आल्या, तरी लिखाणावरील निष्ठा कायम असायला हवी,' असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रकाशक व साहित्यिक अरुणा सबाने यांनी शनिवारी केले.
पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात दोनदिवसीय वार्षिक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे, संस्थेच्या अध्यक्ष शुभांगी भडभडे, विजया ब्राम्हणकर उपस्थित होत्या. सबाने म्हणाल्या, 'प्रत्येकाच्या लिखाणाची शैली, धाटणी व पोत वेगळा असल्यामुळे अनेकदा त्यावरील टीका सहन होत नाही. मात्र, आपण काय लिहितो आणि कशासाठी लिहितो, याचे आत्मपरीक्षण करायले हवे. आत्मपरिक्षणातून दर्जेदार निर्मिती होत असते. मुळात लिखाण इतके सोपे नाही. जे आपण लिहितो त्यावर टीका झाली तर आपण ती सहन करत नाही. जेवढे लिहाल तेवढी आपली लेखणी आणि भाषा समृद्ध होईल, याची सदैव जाणीव ठेवायला हवी.' शैलेश पांडे म्हणाले, 'गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या विषयावर लिहिणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढली आहे. स्त्रियांनी लिखाणामध्ये नवनवे प्रयोग करायला हवेत.
कार्यक्रमात बळवंत भोयर व विजया मारोतकर यांना 'मालिनी राजाभाऊ बोबडे सामाजिक पुरस्कार' प्रदान करण्यात आला. सतीशकुमार पाटील (कोल्हापूर), निर्मलकुमार सूर्यवंशी (नांदेड), अरुण नाईक (गोवा), जयश्री उपाध्ये (नागपूर), परिणिता कवठेकर, आ. य. पवार (जामखेड), ज्योत्स्ना चांदगुडे (पुणे), श्रृती वडगबाळकर (कोल्हापूर), डॉ. संभाजी पाटील (लातूर), संगिता अरबुने (वसई), डॉ. गणेश चव्हाण (नागपूर), गणेश भाकरे (सावनेर) डॉ. वर्षा सगदेव (नागपूर), शामल कामत (मुंबई) यांना पुरस्कृत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता वाईकर यांनी केले.