Monday, 30 March 2020

महाराष्ट्रासमोर आर्थिक संकट; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं केंद्र सरकारला पत्र : मोदींकडून गडकरींवर जबाबदारी : संजय पाटील

SHARE


संजय पाटील: सर्वाधिक करोना बाधित रुग्ण असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. गेल्या काही दिवसात राज्यात करोना बाधितांचा आकडा वेगानं वाढला आहे. त्यामुळे सरकारच्या चिंतेत भर पडली आहे.
देशात आणि राज्यात करोनाचा उद्रेक झाल्यानं काही दिवसांतच चित्र पालटले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. लॉकडाउनमुळे सर्वच क्षेत्रांना झळ सोसावी लागत असून, राज्याच्या उत्पन्नाला यामुळे फटका बसला आहे. करोनामुळे राज्याचं उत्पन्न जवळपास थांबले आहे. राज्यासमोर गंभीर आर्थिक परिस्थिती निर्माण झाली असून, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारचं याकडे लक्ष वेधलं आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्राला पत्र पाठवले आहे.
करोनाचे रुग्ण वाढत असताना केंद्र आणि राज्य सरकारकडून कठोर निर्णय घेतले जात आहेत. प्रादुर्भाव वाढत असल्याचं लक्षात आल्यानंतर केंद्र सरकारनं देशात लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात अगोदरच अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे उद्योग क्षेत्राला झळ सोसावी लागत आहे. त्याचा फटका राज्य सरकारच्या तिजोरीलाही बसू लागला आहे. राज्याच्या तिजोरीत येणारं उत्पन्न थांबलं असून सध्या राज्यासमोर गंभीर आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी पत्रव्यवहार करून चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अशा संकटात केंद्रानं विशेष पॅकेज जाहीर करावं, अशी मागणीही केली आहे.
‘केंद्र सरकारनं देशात तीन आठवड्यांचे लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे उद्योग, व्यापार, सेवा क्षेत्र ठप्प आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात राज्याच्या उत्पन्नात मोठी भर पडते. परंतु,कोरोना आणि लॉकडाऊनमुळे यंदा उत्पन्न जवळपास थांबले आहे. राज्यासमोर गंभीर आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच केंद्र सरकारकडून केंद्रीय करातील हिश्यापोटी राज्याला मिळणारे १,६८७ कोटी तसेच मदतरुपी अनुदानापोटी मिळणारे १४ हजार ९६७ कोटी रुपये अशी एकूण १६ हजार ६५४ कोटींची थकबाकी अद्याप मिळालेली नाही. ही थकबाकी ३१ मार्चपर्यंत राज्याला मिळावी. तसंच ‘कोरोना’च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी २५ हजार कोटींचे विशेष पॅकेज महाराष्ट्राला मंजूर करावं, यासंबंधीचं पत्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन, राज्याचे केंद्रातले मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर यांना पाठवलं आहे,’ अशी माहिती अजित पवार यांनी ट्विट करून दिली आहे.
SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

2 comments:

  1. भारत में कोरोना वायरस के मरीजों की संख्या 100 पार कर गई है और सबसे अधिक मामले महाराष्ट्र में दर्ज किए गए हैं। देश में कोरोना वायरस के मरीजों की संख्या 107 पहुंच गई है और सिर्फ महाराष्ट्र में इसके 31 मामले सामने आए हैं। महाराष्ट्र में कोरोना वायरस के हालात को लेकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे से फोन पर बातचीत की है और हालात का जायजा लिया है। बता दें कि महाराष्ट्र के बाद केरल का नंबर है, जहां 22 मामले सामने आए हैं।

    समाचार एजेंसी एएनआई ने सूत्रों के हवाले से खबर दी है कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे से फोन पर बातचीत की है। उन्होंने राज्य में कोरोना वायरस के हालात और इससे संबंधित उठाए गए कदमों पर चर्चा की है। बता दें कि महाराष्ट्र में कोरोनोवायरस के 31 मामले सामने आने के साथ यह राज्य भारत में वैश्विक महामारी से सबसे अधिक प्रभावित राज्य के रूप में उभरा है।
    एक स्वास्थ्य अधिकारी ने कहा कि पुणे जिले के पिंपरी-चिंचवड में शनिवार देर रात पांच नए मामलों का पता चला। तीन कोरोनोवायरस संदिग्ध जो शनिवार को अहमदनगर सिविल अस्पताल के आइसोलेशन वार्ड से भाग गए थे, रविवार सुबह लौट आए। इसी तरह, नागपुर में मेयो हॉस्पिटल से भागे चार कोरोनोवायरस संदिग्धों में से भी तीन लौट आए हैं, और चौथे का पता लगाने के प्रयास किए जा रहे हैं।

    महाराष्ट्र में एहतियात के तौर पर 31 मार्च तक सभी स्कूलों, कॉलेजों, मॉल, स्विमिंग पूल, जिम और फिटनेस सेंटर, सार्वजनिक स्थानों, सभी सार्वजनिक कार्यक्रमों को रद्द कर दिया गया है।

    आईआईटी-बॉम्बे ने अपने छात्रों, हॉस्टलर्स, फैकल्टी, स्टाफ, विजिटर आदि के लिए अन्य कड़े नियम लागू करने के अलावा 29 मार्च तक सभी क्लासरूम और लेबोरेटरी इंस्ट्रक्शन को भी निलंबित कर दिया है।

    ReplyDelete
  2. मोदींकडून गडकरींवर जबाबदारी

    राज्य सरकारवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न

    करोना प्रतिबंधाबाबत राज्यातील उपाययोजनांवर देखरेख; सरकारवर कुरघोडीचा प्रयत्न

    करोनावर प्रतिबंध घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार प्रभावीपणे उपाययोजना करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राज्यातील स्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगून राज्य सरकारवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात पत्रक प्रसिद्धीला दिले आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना राज्यातील करोना स्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले. आजारावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन होते किंवा नाही तसेच केंद्राकडून अधिक मदतीची गरज आहे काय, याबाबत राज्यातील विविध जिल्ह्य़ांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून खात्री करून घ्यावी, असे गडकरींना सांगण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या निर्देशानुसार गडकरी यांनी राज्यातील १७ जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला व करोनामुळे देशभरात उद्भवलेली समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकार जनतेच्या व अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा संदेश दिला.

    राज्यातील संपूर्ण यंत्रणा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात करोनावर मात करण्यासाठी मागील दोन आठवडय़ांपासून दिवसरात्र प्रयत्न करीत आहे. खुद्द ठाकरे यांचे पंतप्रधानांशी वेळोवेळी दूरध्वनीवरून बोलणेही झाले आहे. असे असताना मोदी यांनी राज्य सरकारच्या मदतीने केंद्राच्या उपाययोजनांचा आढावा घेण्याऐवजी गडकरी यांच्याकडे ही जबाबदारी सोपवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकप्रकारे राज्यसरकारला बाजूला सारून केंद्रच करोनाच्या उपायोजना राबवत आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

    ReplyDelete