संजय पाटील : नागपूर प्रेस मीडिया : 8: 7: 2020 : मुंबई - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले 'राजगृहा'वर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.
आज संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केलंय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.
या घाटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो.......\
जगभर, भारतातील सर्व आंबेडकरी लोकांचे निषेध आहे.
शासनाकडून गंभीर दखल; शांतता, संयम पाळण्याचे अजित पवारांचे आवाहन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्त्वाच्या ‘राजगृह’ निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्हं असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचं दुष्कृत्य आहे. राज्य शासनाने घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून तपासकार्य सुरु केलं आहे. आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
“नागरिकांनी असे दुष्कृत्य करणाऱ्या समाजविघातक शक्तींच्या कुहेतूला बळी पडू नये, शांतता, संयम पाळावा, एकजूट कायम ठेवावी,” असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. “महामानव डॉ. बाबासाहेबांचे कार्य आणि विचार समाजमनात खोलवर रुजले आहेत, आपल्या सर्वांची त्यांच्यावर भक्कम श्रद्धा आहे, त्या श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही,” असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
फडणवीसांकडून निषेध
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील याप्रकरणी निषेध नोंदवला असून आरोपींना तात्काळ अटक केली जावी अशी मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ यावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्य असून आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी आमची मागणी आहे”.
“मी स्वतः मा. भीमराव (दादासाहेब) आंबेडकरजी यांच्याशी फोनवर चर्चा केली तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्तांशी चर्चा करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे,” अशी माहिती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी केलं शांतता राखण्याचं आवाहन
'राजगृह' तोडफोड प्रकरणी धडक कारवाई
मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या दादर येथील ' राजगृह ' या इमारतीत करण्यात आलेल्या तोडफोडीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने शांत राहावे व राजगृहाच्या आजुबाजूला गर्दी करू नये, असे आवाहन बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी केले.
राजगृह हल्ल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. हा तरुण नशेबाज असल्याचे सांगितले जात आहे. या तरुणाची कसून चौकशी सुरू असून त्याने हे कृत्य का केले हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे माटुंगा पोलिसांनी म्हटले आहे. या हल्ल्यानंतर राजगृहाजवळ कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हिंदू कॉलनीमधील राजगृहाबाहेरच्या फुलझाडांची मंगळवारी नासधूस करण्यात आली. यावेळी दगडफेकीत राजगृहाच्या काचांचेही नुकसान झाले. सीसीटीव्ही कॅमेरे फोडून दगडफेक करून हल्लेखोरांनी पळ काढला. याबाबतची माहिती मिळताच माटुंगा पोलिसांसह मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासून दगडफेक करताना दिसणाऱ्या तरुणाला शोधून काढले आहे. या तरुणाच्या चौकशीतून घटनेवर अधिक प्रकाश पडणार आहे.

वास्तूला आता २४ तास सुरक्षा
राजगृहवरील हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वांनीच यावर तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यातूनच 'राजगृह' वास्तूला यापुढे २४ तास पोलिस सुरक्षा देण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 'राजगृह'च्या सुरक्षेचा प्रश्न गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंत्रीमंडळ बैठकीत उपस्थित केला होता. त्यानंतर सुरक्षेबाबत एकमुखाने निर्णय घेण्यात आला. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नंतर माध्यमांना माहिती दिली
मुख्यमंत्र्यांकडून कडक कारवाईचे आदेश
राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजिना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तूत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

शांतता, संयम पाळण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ‘राजगृह’ निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचे दुष्कृत्य आहे. राज्य शासनाने घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून तपासकार्य सुरु केले आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी असे दुष्कृत्य करणाऱ्या समाजविघातक शक्तींच्या वाईट हेतुला बळी पडू नये. शांतता, संयम पाळावा, एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

मनसेचं मराठी समाजाला महत्त्वाचं आवाहन
मुंबई: 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान असलेल्या 'राजगृह'च्या वास्तूवर झालेला हल्ला हा आमच्या प्रज्ञास्थळावरचा हल्ला आहे. महाराष्ट्रधर्मावरचा हल्ला आहे. या भ्याड कृत्याचा निषेध करावा तितका कमीच आहे,' अशी संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दिली आहे दादर हिंदू कॉलनी येथे राजगृह हे बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. मंगळवारी सायंकाळी दोन अज्ञात व्यक्तींनी इमारतीच्या आवारात शिरून मोठ्या प्रमाणात तोडफोड व नासधूस केली. घराच्या काचांवर दगडफेक केली होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनाही लक्ष्य करण्यात आले होते. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी या घटनेचा निषेध केला आहे. मनसेनंही आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून भावना व्यक्त केल्या आहेत. 'हा आमच्या प्रज्ञास्थळावर हल्ला... हा महाराष्ट्रधर्मावरचा हल्ला... ह्या भ्याड कृत्याचा निषेध करावा तितका कमीच आहे. सरकारने आणि मराठी समाजाने अशा समाजविषाणूंना समूळ नष्ट करण्यासाठी आता कृतिशील व्हावं,' असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेचा निषेध करताना राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला आहे. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शांतता व संयम राखण्याचं आवाहन जनतेला केलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी केली पाहणी
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज जाऊन राजगृहची पाहणी केली व आंबेडकर कुटुंबीयांशी चर्चा केली. या परिसरात एखादी पोलीस चौकी असावी ही आंबेडकर कुटुंबाची मागणी सरकार तातडीनं पूर्ण करेल, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

'ज्या वास्तूमध्ये राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला दिशा दिली. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. त्या श्रद्धालयाच्या बाहेर असं काही विकृत होणं हे विकृत व्यक्तीच करू शकतो,' अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राजगृह तोडफोडीच्या प्रकरणावर दिली आहे.
आव्हाड यांनी आज दादर येथे जाऊन राजगृहच्या वास्तूची पाहणी केली आणि आंबेडकर कुटुबीयांशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 'राजगृह ही केवळ वास्तू नाही. हे श्रद्धालय आहे. येथील प्रत्येक अणूरेणूमध्ये बाबासाहेबांच्या वास्तव्याची जाणीव होते. याच वास्तूमध्ये बाबासाहेबांनी अभ्यास केला. त्याच घराबाहेर असं काही होणं हे विकृत आहे आणि विकृतच हे करू शकतो,' असं ते म्हणाले. 'पवार साहेबांच्या सूचनेनुसार मी पाहणी करण्यासाठी इथं आलोय. आंबेडकर कुटुंबीयांशी माझी चर्चा झाली. 'राजगृह'वर नासधूस करणारा एकच माणूस होता आणि तो वेडसर असावा असं आंबेडकर कुटुंबीयांचं म्हणणं आहे,' असं आव्हाड म्हणाले.
'आरोपी कोणीही असो. त्याची सखोल चौकशी सुरू आहे. त्याला कठोरात कठोर शिक्षा होईल असं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी देखील सांगितलंय. कुठलाही राजकीय अभिनिवेष न बाळगता समाजाच्या दृष्टीनं कलंक असलेल्या या घटनेची गंभीर चौकशी करून सरकार सत्य जनतेसमोर आणेल. या प्रकरणाला आत्ताच कुठलाही राजकीय रंग देणं अपरिपक्वतेचं ठरेल. आंबेडकरांचे कुटुंबीय इथं राहतात. त्यांनी सांगितलं ते महत्त्वाचं आहे. त्याच दिशेनं पोलीसही तपास करतील,' असं त्यांनी सांगितलं.
राजगृहाजवळ पोलीस पॉइंट
'राजगृह'च्या परिसरात एखादी पोलीस चौकी असावी, अशी मागणी आंबेडकर कुटुंबीयांनी केली आहे. ही मागणी रास्त असल्याचं आव्हाड म्हणाले. 'ही ऐतिहासिक वास्तू आहे. बाबासाहेब हे १९३२ पासून १९५६ पर्यंत इथंच होते. या वास्तूचं महत्त्व लक्षात घेऊन सरकार आजच्या आज निर्णय घेईल,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.