संजय पाटील : नागपूर प्रेस मीडिया : 1 जुलै 2020 : नागपूर: शिवसेनेचा नागपूर शहर प्रमुख मंगेश कडव याच्यावर २५ लाख रुपये घेतल्याचा आरोप होत असताना, त्याच्याविरुद्ध शहरातील विविध पोलिस स्टेशनमध्ये खंडणी, फसवणुकीसह तीन गुन्हे दाखल झाले आहेत. कडव याच्याविरुद्ध एकाच दिवशी तीन गुन्हे दाखल झाल्याने शिवसेना नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कडव याच्यासह युवा सेनेचा जिल्हा प्रमुख विक्रम राठोडही आठ लाख रुपयांच्या खंडणी प्रकरणात चर्चेत आला आहे. याप्रकरणात राठोड अद्यापही अजनी पोलिसांच्या हाती लागू शकलेला नाही.
हैदराबाद येथील विक्रम मधुकर लाभे (वय ४७) यांचा भरत नगरमधील पुराणिक ले-आऊट येथे बंगला आहे. या बंगल्यावर मंगेश कडव व त्याच्या साथीदारांनी बळजबरीने ताबा घेतला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने व दैनंदिन वापराच्या वस्तू चोरून नेल्या. याबाबत कळताच लाभे नागपुरात आले. त्यांनी कडव याला जाब विचारला असता कडव व त्याच्या तीन साथीदारांनी लाभे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. घर हवे असल्यास दीड कोटी रुपयांची खंडणी दे अशी मागणी केली. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी कडव व त्याच्या साथीदारांविरुद्ध घरफोडी व खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
बिल्डरची केली फसवणूक
बिल्डर देवानंद बाबासाहेब शिर्के (वय ४८,रा. सक्करदरा) यांनी मंगेश कडव याच्यासोबत रघुजीनगरमधील दुकान १८ लाख रुपयांना खरेदी करण्याचा व्यवहार केला. शिर्के यांनी कडव याला धनादेश व रोख असे १५ लाख रुपये दिले. रजिस्ट्रीच्या वेळी साडेतीन लाख रुपये देण्याचे ठरले. मात्र या व्यवहाराला बगल देत कडव याने हे दुकान ५० लाख रुपयांमये बँकेत गहाण ठेवले. शिर्के यांनी कडव याला रजिस्ट्रीबाबत विचारणा केली. तो टाळाटाळ करू लागला. शिर्के यांनी माहिती काढली असता दुकान बँकेत गहाण असल्याचे त्यांना कळले. त्यांनी कडव याच्याकडे पैसे परत मागितले असता कडव याने शिर्के यांना ठार मारण्याची धमकी देऊन २० लाख रुपयांची खंडणी मागितली. 'बेटा, अब शिवसेना का पॉवर हैं, मेरी मुंबई और दिल्ली तक पहुँच है. तेरी अख्खा फॅमिली को उडा दूंगा', अशा शब्दांत कडवने धमकावल्याचे शिर्के यांनी सक्करदरा पोलिसांत केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्यावरून पोलिसांनी फसवणूक व खंडणीचा गुन्हा दाखल केला.

जुना सुभेदार येथील दिनेश रामचंद्र आदमने (वय ४२) यांनी २०१३ मध्ये मंगेश कडव व त्याच्या पत्नीकडून मानेवाड्यातील अमरिवा अपार्टमेंटमधील फ्लॅट १६ लाख रुपयांना खरेदी केला होता. आदमने यांनी कडव याला १५ लाख रुपये दिले होते व उर्वरित रक्कम रजिस्ट्रीच्या वेळी देण्याचे ठरले होते. मात्र कडव याने आदमने यांना रजिस्ट्री करून दिली नाही. त्यांना धनादेश दिले तेही वटले नाहीत. आदमने यांनी पैसे परत मागितले असता कडव याने आदमने यांना ठार मारण्याची धमकी दिली. आदमने यांनी हुडकेश्वर पोलिसांत तक्रार दिली असता पोलिसांनी कडव व त्याच्या पत्नीविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केला.
पक्षातर्फे कारवाई नाही
२५ लाख रुपये घेतल्याच्या आरोपानंतर तीन गुन्हे दाखल झाल्यानंतरही मंगेश कडव याच्याविरुद्ध पक्षाने कारवाई केलेली नाही. शहरातील बड्या नेत्याच्या जवळचा असल्याने कडवविरुद्ध कारवाई होत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यापूर्वी मुंबईतील एका प्रकरणातही कडव चर्चेत आला होता.

शिवसेनेचे शहर प्रमुख मंगेश कडव यांच्यावर २५ लाख रुपये घेतल्याचा आरोप होत असतानाच आता युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखाने सावकाराकडे आठ लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली. अजनी पोलिसांनी सिनेस्टाइल सापळा रचून युवा सेनेचा जिल्हा प्रमुख विक्रम राठोड याचा भाऊ व विभाग प्रमुखाला शनिवारी रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. संजोग सुरेश राठोड (वय ३४,रा. अध्यापकनगर, हुडकेश्वर) असे खंडणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस आता विक्रम राठोड याचा शोध घेत आहेत.
सावकाराने पोलिसांना सांगितले. अजनी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष खांडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचला. दोन पोलिस सावकाराच्या एमएच-४९-बीबी-३८४८ या क्रमांकाच्या कारमध्ये बसले. सावकारासह कारने मेडिकल चौकात गेले. विक्रम याने पुन्हा सावकाराच्या मोबाइल संपर्क साधला. ‘मेडिकल चौकाजवळील शांती निकेतन शाळेजवळ माझा माणूस पैसे घ्यायला येईल, तू तेथे पोहोच’,असे सांगितले. सावकार हा पोलिसांना घेऊन कारने शांती निकेतन शाळेजवळ गेला. याचवेळी एमएच४९-बीएफ-०७३३ या क्रमांकाच्या मोपेडने संजोग तेथे पोहोचला. सावकाराला पैशाची मागणी करताच पोलिसांनी संजोग याला अटक केली. पोलिसांनी विक्रम व संजोगविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. विक्रम हा पसार असून, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.